मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /...म्हणून 1259 युझर्सचे अकाऊंट हटवले; त्या कठोर निर्णयाबाबत Facebook चं स्पष्टीकरण

...म्हणून 1259 युझर्सचे अकाऊंट हटवले; त्या कठोर निर्णयाबाबत Facebook चं स्पष्टीकरण

...म्हणून Facebookने उचलली कठोर पाऊल; 1259 युझर्सवर केली आहे कारवाई

...म्हणून Facebookने उचलली कठोर पाऊल; 1259 युझर्सवर केली आहे कारवाई

फेसबुकने (Facebook) अवघ्या जगाला एकत्र आणलं आहे. कोट्यवधी युझर्स फेसबुकचा वापर करतात. आता फेसबुकनं त्यांच्या पॉलिसीत बदल केला आहे.

  नवी दिल्ली,14 ऑक्टोबर : फेसबुक (Facebook) हा जगातला लोकप्रिय आणि मोठा सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्म आहे. जगभरातले जवळपास तीन अब्ज जण फेसबुकचे अॅक्टिव्ह युझर्स (Active User) आहेत; मात्र गेल्या काही दिवसांमध्ये समाजविघातक कृत्यांसाठी फेसबुकचा वापर वाढत असल्याचं चित्र आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर फेसबुकने काही अकाउंट्स, पेजेस आणि ग्रुप्सवर कारवाई केली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कंपनीने फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरच्या एकूण 1259 युझर्सवर कारवाई केली आहे. सार्वजनिक हिताच्या माहितीमध्ये चुकीच्या पद्धतीनं फेरफार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

  सप्टेंबर महिन्यामध्ये फेसबुकने सुदान (Sudan) आणि इराण (Iran) या दोन देशांतली दोन नेटवर्क्स बंद केली. दोन्ही नेटवर्क्स कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपापल्या देशांच्या लष्करी संस्थांशी जोडलेली होती. आपल्या सैन्याचं कौतुक आणि विरोधी गटांवर टीका करण्यासाठी सामान्य युझर्सना लक्ष्य करत असल्याचं लक्षात आल्यानंतर तिथल्या नेटवर्क सेवा बंद करण्याचा निर्णय फेसबुकनं घेतला. इराणमध्ये करण्यात आलेली कारवाई हे अशा प्रकारचं पहिलंच कन्व्हर्ट इफेक्ट ऑपरेशन आहे. ते देशांतर्गपातळीवर पसरलेलं आणि इस्लामिक रिव्हॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी संबंध असलेल्या व्यक्तींच्या नियंत्रणात होतं, अशी माहिती फेसबुकनं दिली आहे.

  हे वाचा - नवा IT कायदा लागू करण्याच्या तयारीत सरकार, गोपनीयतेवर ठेवलं जाणार विशेष लक्ष

  फेसबुकनं इराणमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 93 फेसबुक अकाउंट्स, 14 पेजेस, 15 ग्रुप्स आणि 194 इन्स्टाग्राम अकाउंट्सवर कारवाई करून ती डिलीट केली आहेत. कारवाई झालेली अकाउंट्स सर्वसामान्य युझर्सना लक्ष्य करत होते. या भागात 'सस्पीशियस कॉर्डिनेट अनऑथेन्टिक बिहेवियर'अंतर्गत तपास करत असताना संबंधित प्रकार कंपनीला आढळला होता. त्याचा अधिक तपास केला असता इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सशी त्याचा संबंध असल्याचं निदर्शनास आल्याचं फेसबुकनं एका निवेदनात म्हटलं आहे.

  इराणसोबतच सुदानमध्येदेखील फेसबुकनं कारवाई करत 116 पेजेस, 666 फेसबुक अकाउंट्स, 69 ग्रुप आणि 92 इन्स्टाग्राम अकाउंट्स डिलीट केली आहेत. कारवाई करण्यात आलेली अकाउंट्स सुदानच्या रॅपिड सपोर्ट फोर्सेसशी संबंधित असल्याचं फेसबुकनं म्हटल आहे.

  फेसबुकने मंगळवारी एका ब्लॉगपोस्टमधून त्यांची भूमिका मांडली. युझर्सची सुरक्षा निश्चित करण्यासाठी सातत्यानं काम सुरू आहे. सुरक्षा विभागासाठी 2016 पासून फिक्स टीम आणि तंत्रज्ञानात 13 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. सध्या कंपनीतले 40 हजार कर्मचारी युझर्सच्या सुरक्षिततेसाठी काम करत आहेत.

  हे वाचा - Google ने बॅन केले Login-ID चोरी करणारे हे Apps, फोनमधून लगेच डिलीट करुन बदला Facebook Password

  लेटेस्ट आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या मदतीनं कंपनीनं या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत तीन अब्ज फेक अकाउंट्स (Fake Accounts) बंद केली आहेत. आमच्या सेवेच्या प्रभावासंबंधी सुरू असलेला शोध आणि चौकशी करण्याची ही पद्धत नवे मुद्दे शोधून काढणं आणि प्रक्रिया पुढे नेण्यासाठी मदत करेल, असा आम्हाला विश्वास आहे, असं फेसबुकनं या ब्लॉगद्वारे जाहीर केलं आहे.

  First published:

  Tags: Facebook, Technology