नवी दिल्ली, 11 एप्रिल : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर (Facebook) कोणतंही स्टेटस, फोटो, स्टोरी पब्लिक पोस्ट (Public Post) केल्यानंतर त्यावर अशा काही लोकांच्या कमेंट येतात, जे आपल्याला पसंत नसतात आणि एखाद्या कारणामुळे आपल्याला त्यांना ब्लॉकही करता येत नसतं. अशी समस्या आता फेसबुक लवकरच दूर करणार आहे. मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांची सोशल मीडिया कंपनी फेसबुक लवकरच असं फीचर आणणार आहे, ज्यात युजरकडे असा ऑप्शन असेल, की ते आपल्या पब्लिक पोस्ट बाबत ठरवू शकतील की कोणी कमेंट करावी आणि कोणी नाही.
एवढंच नाही तर फेसबुक युजर्सला फीड फिल्टर बारचा उपयोग करुन आपल्या न्यूड फीड सॉर्ट करण्याचा आणि ब्राउज करण्याचाही पर्याय मिळेल.
कसा करता येईल या टूलचा वापर?
- टॉप राईट कॉर्नरवर drop-down मेन्यूवर क्लिक करा.
- येथे सेटिंग्ज अँड प्रायव्हसीवर जाऊन, सेटिंगवर क्लिक करा.
- त्यानंतर पब्लिक पोस्टच्या डाव्या बाजूला क्लिक करा.
- आता Who Can Follow Me वर जा आणि येथे Public सिलेक्टेड आहे का हे तपासा.
- त्यानंतर Public Post Comments वर क्लिक करा.
- येथे कोणाला कमेंट करण्यासाठी परवानगी द्यावी ते ठरवा. या सेटिंगनंतर तुम्ही परवानगी दिलेल्या लोकांनाच तुमच्या पब्लिक पोस्टवर कमेंट करता येईल.
न्यूज फीड फिल्टर -
न्यूज फीड सॉर्ट करण्यासाठी आणि ब्राउजिंग सहन करण्यासाठी फेसबुकचं फीचर आहे. यात Favourites चा पर्याय मिळेल, ज्यात युजर 30 फ्रेंड्स आणि न्यूज फीड सिलेक्ट करू शकतील, ज्या टॉपवर दिसतील. तसंच फेसबुक एक न्यूज फीड फिल्टर बार आणणार आहे. जो न्यूज फीडमध्ये दिसेल. ज्यात युजरला लेटेस्ट न्यूज फीड पाहणं आधी पसंत आहे, की रॅकिंगच्या हिशोबाने न्यूज फीड पाहाणं पसंत असेल, हा पर्याय मिळेल.
आयफोन युजर्सला मिळणार हे फिचर -
अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स फेसबुक App ला ओपन करुन फीड फिल्टर बारला एक्सेस करू शकतील, ज्यावेळी ते न्यूज फीड स्क्रोल करतील. परंतु आयओएस युजर्ससाठी हे फीचर सध्या उपलब्ध नाही. परंतु आयफोन युजर्ससाठी येणाऱ्या काही दिवसांत हे फीचर उपलब्ध होईल असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.