मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook चा iPhone यूजर्सना जोरदार झटका, 'हे' फीचर अचानक गायब

Facebook चा iPhone यूजर्सना जोरदार झटका, 'हे' फीचर अचानक गायब

फेसबुकवरील डार्क मोड इंटरफेस गायब झाल्याची अडचण सांगण्यासाठी अनेकांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा (Twitter) व सोशल मीडियावरील इतर माध्यमांचा आधार घेतला आहे. आपल्याला आलेल्या अडचणी ते थेट ट्वीट करून सांगत आहेत.

मुंबई, 30 मे: मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, सॉफ्टवेअर आणि ऑनलाइन सेवा देणारी जगातील सर्वांत विश्वासार्ह आणि मोठी कंपनी असणाऱ्या अॅपलला (Apple) फेसबुकची मालकी असलेल्या मेटा कंपनीने मोठा झटका दिला आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता फेसबुकने (Facebook) अॅपलच्या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आयओएस (iOS) वरून डार्क मोड इंटरफेस (Dark Mode Interface) गायब केला आहे. ‘आयओएस’ वापरणाऱ्या अनेकांच्या गॅझेटमधून डार्क मोड निघून गेल्याने तक्रारी वाढत चालल्या आहेत. आश्चर्य म्हणजे, फेसबुकडून या तक्रारींची दखल घेतली गेली नसून, समस्या कधी सुटेल याबद्दल निश्चित सांगितले गेले नाही. ही समस्या उद्भवण्यामागे बग (Bug) असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे फेसबुक आधी आयओएसमध्ये सिस्टिम वाईड डार्क मोड टॉगल हा पर्याय मेन्यूमध्ये उपलब्ध करून देत होतं.

‘नाईन टू फाइव्ह मॅक’ (9to5Mac) या अॅपलच्या अधिकृत बातम्या देणाऱ्या साईटवर आयओएसवर उदभवलेली अडचण सांगितली गेल्याचं वृत्त ‘झी न्यूज हिंदी’ने दिलं आहे. फेसबुकवरील डार्क मोड इंटरफेस गायब झाल्याची अडचण सांगण्यासाठी अनेकांनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरचा (Twitter) व सोशल मीडियावरील इतर माध्यमांचा आधार घेतला आहे. आपल्याला आलेल्या अडचणी ते थेट ट्वीट करून सांगत आहेत. डार्क मोड इंटरफेस अचानक गायब झाल्याने आयफोनवर फेसबुकचा वापर करणाऱ्या नेटिझन्सना त्रास सहन करावा लागला. ट्वीट करताना अनेक वापरकर्त्यांनी फेसबुकच्या विरोधात तीव्र शब्दांत आपला राग व्यक्त केला. याचीची दखल घेऊन ‘9to5Mac’ मध्ये यावर भाष्य करण्यात आले आहे.

सरकार बॅकफूटवर; या कारणामुळे आधारकार्डची झेरॉक्स न देण्याबाबतचा सल्ला मागे

फेसबुक अॅपमध्ये डार्क मोडला मॅन्युअल पद्धतीने सुरू करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचे रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हा मोठा ‘बग’ नसला तरी आयफोन (iPhone) किंवा आयपॅडवर (ipad) जा सिस्टीम-वाईड डार्क मोड कार्यान्वित असेल तर तो अचानक गायब झाल्याने मोठी समस्या निर्माण होऊ शकते. 2019 मध्ये iOS 13 च्या रिलीजवेळीच iOS साठी सिस्टिम-वाइड डार्क मोड सपोर्ट देण्यात आला होता.

Masked Aadhar Card: मास्क्ड आधारकार्डबद्दल माहित आहे का? कुठे केला जातो वापर? चेक करा सर्वकाही

2019 मध्ये सर्वप्रथम फिचर झाले लाँच

अॅपल कंपनीने सर्वप्रथम 2019 मे सर्वात पहिले iOS 13 मध्ये आयफोन आणि आयपॅडवर डार्क मोड उपलब्ध करून दिला होता. एका वर्षानंतर 2020 मध्ये मेटा कंपनीने फेसबुकच्या वेब आधारित प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या अँड्राइड व आयओएस आधारित अॅपवर या सुविधेला सुरूवात केली होती. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीचा वापरकर्त्यांना त्रास होत आहे. संबंधीत कंपन्या लवकरात लवकर अडचण दूर करतील अशी अपेक्षा युजर्सना आहे.

First published:

Tags: Apple, Facebook, Tech news