खूशखबर! जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट

खूशखबर! जिओकडून ग्राहकांना ‘व्हॅलेंटाइन’ गिफ्ट

व्हॅलेंटाइन डेला जिओने आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे.

  • Share this:

14 फेब्रुवारी : रिलायन्स जिओ कायमच आपल्या ग्राहकांना एकाहून एक ऑफर्स देत खूश करत असते. व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी जिओने आपल्या ग्राहकांना आणखी एक सुखद धक्का दिला आहे. आता जिओचा फोन वापरणाऱ्या ग्राहकांना फोनवर फेसबुकही वापरता येणार आहे.

इतके दिवस या मोबाईलवर फेसबुक वापरणे शक्य होत नव्हते. मात्र आता जिओने आपल्या ग्राहकांसाठी ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. जिओ फोनचे युजर्स व्हॅलेंटाइन डे पासून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात असे जिओकडून सांगण्यात आले आहे.

व्हॅलेंटाइन डे पासून जिओ अ‍ॅपस्टोरवरून फेसबुक अ‍ॅप डाऊनलोड करू शकतील. फेसबुक अ‍ॅपचं हे खास व्हर्जन जिओच्या ऑपरेटींग सिस्साटीमसाठी तयार करण्यात आलं आहे. यामध्ये पुश-नोटिफिकेशन, व्हिडिओ आणि एक्सर्नल कंटेट लिंक असे काही फीचर्स असतील.

याबाबत जिओचे मुख्य आकाश अंबानी म्हणाले की, फेसबुक तर केवळ सुरूवात आहे. येत्या काळात जिओफोन जगातली सगळ्यात चांगली मोबाईल अ‍ॅप एकाच जागी आणतील. या सगळ्यामुळे जिओचे ग्राहक आजपासून फेसबुक वापरण्याचा आनंद लुटू शकतात.

First published: February 14, 2018, 7:03 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading