FaceApp मुळे सापडला 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा!

FaceApp मुळे सापडला 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा!

सध्या सोशल मीडियावर फेसअॅप वापरून वय वाढल्यानंतरचे फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहेत.

  • Share this:

बिजिंग, 20 जुलै : सोशल मीडिया नेटवर्किंग साईट फेसबुकवर युजर्स फेसअॅप वापरून वय वाढल्यावर आपण कसे दिसू याचे फोटो शेअर केले जात आहेत. एका आर्टीफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या मदतीने हे होत आहे. फेसबुकवर जरी मनोरंजन म्हणून याकडं बघितलं जात असलं तरी यामुळे 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या मुलाचा शोध लागला आहे.

चीनमध्ये एका कुटुंबातील 18 वर्षांपूर्वी अपहरण झालेला मुलगा फेसअॅपमुळे परत मिळाला. तीन वर्षांचा असताना मुलाचे अपहरण झाले होते. पोलिसांनी फेसअॅपचा वापर करून मुलाच्या जुन्या फोटोवरून आताचा फोटो तयार केला. त्यानंतर तो आता कसा दिसत असेल याचा अंदाज लावून शोधमोहिम सुरु केली.

चिनी पोलिसांनी ज्या AI तंत्रज्ञानाचा वापर केला ते चीनच्या टेक आणि इंटरनेट कंपनीनं तयार केलं आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे लहान मुलाच्या फोटोवरून ते आता कसे दिसत असेल हे दिसतं. त्यानंतर तपास अधिकाऱ्यांनी या फोटोवरून फेशियल रिकग्निशन तंत्रज्ञानाच्या आधारावर पडताळणी केली.

सॉफ्टवेअरच्या मदतीने जवळपास 100 लोकांचा तपास करण्यात आला. त्यानंतर मुलाचा शोध लागला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या झेंग झेनहाई यांनी म्हटले की, जेव्हा त्या मुलाला भेटलो तेव्हा त्याला अपहरण झाल्याचं काहीच माहिती नव्हतं. त्याची डीएनए टेस्ट केल्यानंतर सर्व काही समोर आलं.

विफेंग नावाचा मुलगा 2001 मध्ये बेपत्ता झाला होता. त्याच्या वडिलांच्या कन्स्ट्रक्शन साइटवर त्यांच्यासोबत तो गेला होता. तेव्हा खेळत असताना तिथून अपहरण झालं होतं. गेल्या 18 वर्षांत ज्यांनी त्याचा सांभाळ केला त्याचं आभारही विफेंगच्या वडिलांनी मानलं.

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू

First published: July 20, 2019, 8:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading