मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /चेहरा पाहून सुरू होणार ATM; या टेक्नोलॉजीमुळे असा बसेल फसवणुकीला आळा

चेहरा पाहून सुरू होणार ATM; या टेक्नोलॉजीमुळे असा बसेल फसवणुकीला आळा

या नव्या सिस्टममुळे लोकांचा युजर आयडी चोरी होण्याचा धोका कमी होईल. तसंच कोणताही हॅकर कोणत्याही युजरच्या कार्डचं क्लोनिंग करू शकणार नाही.

या नव्या सिस्टममुळे लोकांचा युजर आयडी चोरी होण्याचा धोका कमी होईल. तसंच कोणताही हॅकर कोणत्याही युजरच्या कार्डचं क्लोनिंग करू शकणार नाही.

या नव्या सिस्टममुळे लोकांचा युजर आयडी चोरी होण्याचा धोका कमी होईल. तसंच कोणताही हॅकर कोणत्याही युजरच्या कार्डचं क्लोनिंग करू शकणार नाही.

नवी दिल्ली, 9 जानेवारी : इंटेल कंपनीने एक नवं फेशियल रिकग्निशन सिस्टम आणलं आहे. RealSense ID असं याचं नाव आहे. हे नवं तंत्रज्ञान युजर्ससाठी फायदेशीर ठरु शकतं. हे सिस्टम युजरला ओळखून कोणत्याही स्मार्ट डिव्हाईसला त्वरित अनलॉक करेल. इंटेलने हे तंत्रज्ञान बनवण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह डेप्थ सेन्सरचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानाने युजरची चुकीची ओळख होणार नसल्याचा दावा कंपनीने केला आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे सुरक्षित आणि अचूक असल्याचं सांगण्यात आलं आहे.

इंटेलकडून लाँच करण्यात आलेलं फेस आयडी सिस्टम अनेक डिव्हाईसेससोबत काम करेल. यात स्मार्ट लॉक, एटीएम किंवा गेट कंट्रोलला अनलॉक करायचं असल्यास या तंत्रज्ञानाची मदत घेता येऊ शकते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या पहिल्या तिमाहीदरम्यान याची विक्री सुरू होणार आहे. तसंच भारताशिवाय इतर देशांमध्ये या सिस्टमची विक्री उपलब्ध करण्यात येणार आहे.

(वाचा - WhatsAppच्या नव्या अटींमुळे युजर्स दुसऱ्या पर्यायाच्या शोधात; या App ला पसंती)

युजर्सला कसा होईल फायदा -

या सिस्टममुळे व्यक्तीचा आयडी चोरी होण्याचा धोका कमी होईल. सध्या वापरल्या जाणाऱ्या ट्रेडिशनल ऑथेंटिकेशन पर्यायामुळे आयडी चोरी होण्याचा धोका असतो. मात्र कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या सिस्टममुळे युजरच्या चेहऱ्यात वेळोवेळी काय बदल होत आहे हेदेखील अडॉप्ट केलं जाईल. या तंत्रज्ञानासाठी युजरला कोणत्याही दुसऱ्या नेटवर्कची आवश्यकता भासणार नाही. यात युजरचा चेहरा पूर्णपणे एन्क्रिप्टेड असेल.

बाहेरच्या देशांमध्ये असं तंत्रज्ञान लागू करण्यात आलं आहे की, विना फेशियल रिकग्निशन कोणताही व्यक्ती ATM मध्ये एन्ट्री करू शकणार नाही. अशात या नव्या फेशियल रिकग्निशन सिस्टम RealSense ID चा ATM किंवा इतर कोणत्याही ठिकाणी वापर केला जात असताना, आयडीशिवाय एन्ट्री होणार नाही, जे फोटोग्राफ्स व्हिडीओ किंवा मास्कद्वारे एन्ट्री करू इच्छितात. त्यामुळे लोकांचा युजर आयडी चोरी होण्याचा धोका कमी होईल. तसंच कोणताही हॅकर कोणत्याही युजरच्या कार्डचं क्लोनिंग करू शकणार नाही.

(वाचा - कसं शक्य आहे? 12000 फूट उंचावरुन पडलेला iPhone आढळला चालू स्थितीत, VIDEO VIRAL)

काय आहे फेशियल रिकॉग्निशन सिस्टम -

हे एक बायोमेट्रिक सिस्टम आहे, जे चेहरा, डोळे, तोंड याच्याद्वारे व्यक्तीची ओळख करते. व्यक्तीच्या डोळे आणि तोंडाचं खासकरून कॉम्बिनेशन घेतलं जातं, ज्याद्वारे चेहऱ्याची एक 3D इमेज तयार केली जाते आणि ती डेटाबेसमध्ये सेव्ह केली जाते.

या डिव्हाईसच्या F455 पेरीफेरलची किंमत 99 डॉलर म्हणजे जवळपास 7300 रुपये असू शकते. तर याच्या F450 मॉड्यूल 10-पॅकची किंमत 750 डॉलर जवळपास 55,100 रुपये असेल. यासाठी बुकिंग सुरू झालं असून याची डिलिव्हरी मार्चच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.

First published:

Tags: Technology