• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • VIDEO: iPhone 11 की Nokia 3310; कोणता फोन अधिक मजबूत? पाहण्यासाठी फोनवरुन घातली कार अन्..

VIDEO: iPhone 11 की Nokia 3310; कोणता फोन अधिक मजबूत? पाहण्यासाठी फोनवरुन घातली कार अन्..

यूट्यूबर HaerteTest ने iPhone 11 आणि Nokia 3310 सोबत हैराण करणारं एक्सपेरिमेंट केलं आहे. दोन्ही फोनपैकी कोणता फोन सर्वात मजबूत आहे, हे पाहण्यासाठी iPhone 11 आणि Nokia 3310 फोन कारच्या टायरखाली ठेवण्यात आले

 • Share this:
  नवी दिल्ली, 7 ऑगस्ट : स्मार्टफोनचा (Smartphone) वापर सर्वच वयोगटातील लोकांकडून होत असताना, त्यात आयफोनची (iPhone) मोठी क्रेझ आहे. आयफोन सर्वात मजबूत फोनही मानला जातो. अनेक लोक आयफोनवर विविध एक्सपेरिमेंट करत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. आयफोन फटाक्यांच्या बॉक्समध्ये ठेवून त्याचा ब्लॉस्ट करणं, अॅसिडमध्ये टाकणं असे अनेक एक्सपेरिमेंट आयफोनवर करण्यात आल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतु आता एकाने आयफोनच्या मजबूतीबाबत एक एक्सपेरिमेंट केलं आहे. मागील काही वर्षांपूर्वी नोकिया कंपनीचा 3310 (Nokia 3310) फोन सर्वात मजबूत मानला जात होता. आता त्याच फोनसह iPhone 11 मजबूती तपासण्यात आली आहे. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या दोन्ही फोनवर वजनदार कार चालवण्यात आली आहे. यूट्यूबर HaerteTest ने iPhone 11 आणि Nokia 3310 सोबत हैराण करणारं एक्सपेरिमेंट केलं आहे. दोन्ही फोनपैकी कोणता फोन सर्वात मजबूत आहे, हे पाहण्यासाठी iPhone 11 आणि Nokia 3310 फोन कारच्या टायरखाली ठेवण्यात आले. ड्रायव्हरने दोन्ही फोनवरुन कारचे टायर नेले.

  VIDEO: फटक्यांमध्ये बंद केला iPhone 11 pro, डब्ब्याला आग लावली आणि...

  या एक्सपेरिमेंटमध्ये Nokia 3310 फोनचं कव्हरचं तुटलं. तसंच हा फोन चालूही होत नव्हता. तसंच iPhone 11 चं बॅक पॅनलही तुटलं होतं. हे एक्सपेरिमेंट, असा स्टंट कोणीही करण्याचा प्रयत्न करू नये. या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेलं एक्सपेरिमेंट एक्सपर्ट्सच्या निगराणीत करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत 5 कोटीहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. आतापर्यंत अनेकांनी आयफोनबाबत विविध एक्सपेरिमेंट केले आहेत.
  Published by:Karishma
  First published: