Home /News /technology /

तंत्रज्ञानाचा अतिरेक स्मार्ट नाही तर धोकादायक; Smart Home संकल्पना कशी साकाराल? वाचा सविस्तर

तंत्रज्ञानाचा अतिरेक स्मार्ट नाही तर धोकादायक; Smart Home संकल्पना कशी साकाराल? वाचा सविस्तर

Smart home

Smart home

Smart Home Technology: आजकाल लोक घर बनवताना तंत्रज्ञान वापरण्यावर विशेष भर देताना दिसत आहेत. पण तंत्रज्ञानाचा जास्त उपयोग हा सुरक्षेच्या दृष्टीने नुकसानदायक ठरू शकतो.

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी  :  गेल्या काही वर्षांपासून म्हणजेच मोबाईल (Mobile), इंटरनेट (Internet) सेवा उपलब्ध झाल्यापासून या गोष्टींचा वापर भारतात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कामे सुलभ, वेगात होऊन श्रम आणि वेळेची बचत यामुळे होऊ लागली आहे. भारतीयांचा तंत्रज्ञान वापराकडे वाढत असलेला कल पाहून, अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करुन देण्यास कंपन्या प्राधान्य देत आहेत. त्यातही मोबाईल किंवा स्मार्टफोन (SmartPhone) सर्वाधिक वेगाने अपडेट होत आहेत. सध्या स्मार्टफोनचा वापर करुन घरातील इलेक्ट्रीक आणि इलेक्ट्राॅनिक वस्तु आॅपरेट करण्याकडे भारतीयांचा देखील कल वाढल्याचे दिसून येते. परंतु, अशा पध्दतीने होणारा अतिवापर हा धोकादायक ठरु शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणं आहे. येत्या तीन ते चार वर्षांत घरातील काॅफी मशीन किंवा वाॅशिंग मशीन सुरु करणे, आपला बाथटब भरणे किंवा दारावरील बेल वाजल्यास उत्तर देणे या गोष्टी कृत्रिम बुध्दीमत्तेच्या (Artificial Intelligence) सहाय्याने मोठ्या प्रमाणात केल्या जातील. याचाच अर्थ असा की अशी कामे करण्यासाठी तुम्हाला अगदी बेडवरुन उठण्याची देखील गरज नाही. पण या गोष्टी अधिक जोखमीच्या ठरु शकतात, असे मनी कंट्रोलच्या वृत्तात म्हटलं आहे. जरा विचार करा, एकदा कॉफीमेकर स्मार्ट झाला की, तो तुम्हाला एकाच पेयाची मात्रा तुम्ही सांगितलेल्या वेळेवर तयार करुन देईल. मात्र जर तुम्ही त्यावेळी जर झोपलेले असाल किंवा घरी नसाल तर काय होईल?  तुम्ही जर काॅफी मशीन बंद केले नाही तर तो त्याच्या सेटिंगप्रमाणे काम करतच राहिल. आणि काफी उकळून सांडून जाईल. या अशा आॅटोमॅटीक फंक्शनमुळे कदाचित तुमच्या घरातील लहान मुलं आणि पाळीव प्राण्यांना इजा देखील होऊ शकते. अशा प्रकारे एखादे घर हे स्मार्ट होम कसे असू शकते, याबाबत 1950 मध्ये प्रसिध्द लेखक रे ब्रॅडबरी यांनी त्यांच्या देअर विल कम साॅफ्ट रेन्स या लघुकथेत चितारले आहे. अणु ऊर्जेच्या वापरामुळे मानवी जीवनाला कसा त्रास सहन करावा लागेल याचा उल्लेख या कथेत होताच, पण 2026 मध्ये सर्व घरं स्मार्ट होतील (Smart Home) आणि त्यांना कोणत्याही कामासाठी अन्य व्यक्तींची मदत घ्यावी लागणार नाही. या घरांमध्ये अन्न शिजवणे, भांडी स्वच्छ करणे, बेड स्वच्छ करण्यासारखी कामे मानवी हस्तक्षेपाशिवाय होतील. प्रत्येक गोष्ट ही प्री प्रोग्राम्ड असेल. घरातील व्यक्ती घरात नसतानाही सर्व कामे वेळच्या वेळी केली जातील. सुमारे 71 वर्षांपूर्वी ही कथा जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हा लोकांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अशी कामे होऊ शकतात, या गोष्टीवर विश्वासच बसला नाही. परंतु, आता 2021 मध्ये अशा प्रकारची इलेक्ट्राॅनिक अॅप्लायसेन्स (Electronic Appliances) उपलब्ध झाली आहेत. घरातील स्मार्ट उपकरणांचा वापर हा जरा फायदेशीर आहे, तसेच त्यामध्ये काही धोके देखील आहेत. उदाहरणार्थ, कृत्रिम बुध्दीमत्तेच्या वापरातून चेहरा ओळखून प्री प्रोग्राम केलेल्या डेटाआधारे दरवाजा पाहुण्यांसाठी सहजपणे उघडला जाऊ शकतो. म्हणजेच दरवाजा उघडण्यासाठी जर घरात आया किंवा मदतनीस उपलब्ध नसेल तरी दरवाजा उघडेल आणि पाहुणे घरात प्रवेश करतील. परंतु, अनेक प्रकारे केलेल्या अभ्यासांती असे स्पष्ट झाले आहे की कृत्रिम बुध्दिमत्तेवर आधारित तंत्रज्ञान हे पूर्णतः सुरक्षित नाही. 2019 मध्ये  अमेरिकेत झालेल्या अभ्यासावरुन असे दिसून आले आहे की काॅकेशियन चेहऱ्यांच्या तुलनेत अफ्रिकन-अमेरिकन आणि अशियाई चेहरे ओळखण्यासाठी अल्गोरिदम बरेच अचूक आहेत. समजा जर तुम्ही घरात नसाल आणि तुमच्या घरातील मदतनीस, आया किंवा नातेवाईकांसारखा दिसणारा चेहरा या तंत्रज्ञानाला वाटला तर एखादी अनोळखी व्यक्ती घरात सहज घुसखोरी करु शकेल. जर हे तंत्रज्ञान चेहरा ओळखण्यात अपयशी ठरले तर एखादी अनोळखी व्यक्ती घरात घुसली तर किती धोकादायक ठरेल, याचा विचार न केलेलाच बरा. घरातील स्मार्ट उपकरणे ही मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी धोकादायक ठरु शकतात. एखादा लहान मुलगा कोणाचेही लक्ष नसताना सहजपणे वाशिंग मशीन सुरु करु शकेल. आणि तो चुकून मशीनमध्ये अडकल्याने दुर्घटना देखील घडू शकेल. दिवसाच्या विशिष्ठ वेळी विशिष्ठ तापमानात प्री-प्रोगाम्ड गिझरच्या सहाय्याने भरु शकणाऱ्या बाथटबच्याबाबतही अशीच दुर्घटना घडू शकते. अशा वेळी जर तुम्ही घरात नसाल आणि लहान मुले किंवा जेष्ठ व्यक्ती वेळेत स्वीच बंद करु शकल्या नाहीत तर काय होईल, याचा विचार न केलेलाच बरा.

हे देखील वाचा -    व्हा अधिक स्मार्ट! आता मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून बाळगा Aadhaar Card; वाचा संपूर्ण प्रक्रिया

या उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी हे संभाव्य धोके ओळखून ग्राहकांच्या सावधानतेसाठी मॅन्युअली यंत्र बंद करण्याचे पर्याय उपलब्ध करुन दिले आहेत. पण मग कृत्रिम बुध्दीमत्तेवर आधारित तंत्रज्ञान सर्व गोष्टी सोप्या करण्यासाठी असताना मॅन्युअल फंक्शनचा (Manual Functions) पर्याय कशासाठी? तसेच या उपकरणांमधील डेटा कोण सेव्ह करते, तो कसा वापरला जातो याबाबतही भिती असतेच. जर एखाद्या हॅकरने उपकरणांची ही यंत्रणा हॅक करुन दुर्घटना घडवण्याचा प्रयत्न केला तर?  यावर उपाय म्हणून तैवान सारख्या देशात स्मार्ट रोबोटला जोडलेली उपकरणे अधिक प्रमाणात वापरली जातात. मात्र तेथे देखील हॅकर्स (Hackers) या यंत्रणेतील त्रुटींचा दुरुपयोग करुन यंत्रणा हॅक करण्याच्या घटना अगदी सामान्य आहेत. नुकत्याच झालेल्या कन्झ्युमर इलेक्ट्राॅनिक्स काॅन्फरन्समध्ये आयओटी अभियंत्यांनी हॅकर्सने घरगुती उपकरणांवर नियंत्रण मिळवत त्यांचे नुकसान केल्याच्या घटना सांगितल्या. या घटनांमध्ये घरगुती उपकरणांवरील नियंत्रण सोडण्यासाठी काही हॅकर्सने बीटकाॅईन किंवा रोख रकमेची मागणी केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर हॅकिंग टाळण्यासाठी आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी प्रक्रिया नेमकी कशी आहे?  या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर मिळेपर्यंत घर पूर्णतः स्मार्ट बनवणे धोक्याचे आहे. बाजारपेठेचा कल आहे म्हणून अनेक जण घरे स्मार्ट बनवण्यासाठी अशा स्मार्ट उपकरणांचा वापर करताना दिसतात, मात्र संभाव्य धोके लक्षात घेत त्यांना असे करण्यापासून परावृत्त केले पाहिजे. मात्र काही नवीन इनोव्हेशन्स (Innovations) उपयुक्तच आहेत, जसे की दिवे आणि पंखे बंद करण्यासाठी अशा तंत्रज्ञानाचा वापर करणे किंवा एसीचे तापमान सेट करण्यासाठी मोबाईल सेन्सरवर आधारित तंत्रज्ञान वापरणे किंवा पदार्थांचा दर्जा आणि तापमान तपासण्यासाठी रेफ्रिजीरेटरमध्ये कॅमेरे बसवणे. मात्र यापेक्षा या तंत्रज्ञानाचा अधिक वापर धोकादायक ठरु शकतो.
Published by:news18 desk
First published:

Tags: Internet, Mobile, Smart phone, Tech news, Technology

पुढील बातम्या