मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

दिवसभर AC वापरूनही वाढणार नाही विजेचं बिल, जाणून घ्या 'या' खास टीप्स

दिवसभर AC वापरूनही वाढणार नाही विजेचं बिल, जाणून घ्या 'या' खास टीप्स

उन्हाळ्यात गारवा मिळावा, यासाठी एसीचा वापर होतो; पण यामुळे भरमसाठ वीजबिल येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो आणि अनेक जण एसीचा वापर मर्यादित स्वरूपात करतात.

उन्हाळ्यात गारवा मिळावा, यासाठी एसीचा वापर होतो; पण यामुळे भरमसाठ वीजबिल येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो आणि अनेक जण एसीचा वापर मर्यादित स्वरूपात करतात.

उन्हाळ्यात गारवा मिळावा, यासाठी एसीचा वापर होतो; पण यामुळे भरमसाठ वीजबिल येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो आणि अनेक जण एसीचा वापर मर्यादित स्वरूपात करतात.

मुंबई, 11 एप्रिल : सध्या तीव्र उन्हाळा (Heat) जाणवत आहे. गेल्या काही दिवसांत कमाल तापमानात (Maximum Temperature) चांगलीच वाढ झाल्याचं दिसून येत आहे. वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळावा यासाठी पंखे, एसी, कूलरचा वापर वाढला आहे. घरात गारवा राहावा यासाठी अनेक जण एसी अर्थात एअर कंडिशनरचा (Air conditioner) वापर करतात; मात्र एसी (AC) वापरत असताना मनात कुठे तरी वीज बिलाचं (Electricity Bill) टेन्शन कायम असतं. एसी वापरल्यानं वीज बिल जास्त येईल का, असा प्रश्न अनेकांना सतावत असतो. काही गोष्टींचा काटेकोर अवलंब हे या प्रश्नावरचं उत्तर आहे. एसीचा वापर करताना तुम्ही काही गोष्टींची काळजी घेतली, तर वीज बिलात होणारी वाढ काही अंशी नक्कीच टाळता येते.

उन्हाळ्यात गारवा मिळावा, यासाठी एसीचा वापर होतो; पण यामुळे भरमसाठ वीजबिल येणार नाही ना, असा प्रश्न निर्माण होतो आणि अनेक जण एसीचा वापर मर्यादित स्वरूपात करतात. काही टिप्स वापरल्या तर एसीचा मनसोक्त वापर करता येतो आणि विजेची बचत होऊन बिलातही फारशी वाढ होत नाही. वीजबिलात बचत व्हावी यासाठी वेळोवेळी एसीचं सर्व्हिसिंग (Servicing) करणं आवश्यक आहे. डक्ट्स (Ducts) आणि व्हेंट्समध्ये घाण साचल्याने खोलीत थंडावा पोहोचवताना एकूणच एसीच्या यंत्रणेवर ताण येतो. खराब झालेला फिल्टर बदलल्यास एसीचा ऊर्जेचा वापर 5 ते 15 टक्क्यांनी कमी होतो. तसंच एसीचं नियमित सर्व्हिसिंग केल्याने तो लवकर खराब किंवा नादुरुस्त होत नाही, याबाबतची माहिती 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे.

(तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर 'ही' सेवा वापरण्यासाठी द्यावा लागणार चार्ज)

जेव्हा तुम्ही खोलीतला (Room) एसी सुरू करता तेव्हा सर्वप्रथम खोलीची दारं आणि खिडक्या बंद करणं आवश्यक आहे. दिवसा उष्णतेमुळे खोलीतला उष्मा वाढू नये, यासाठी खिडक्यांना पडदे लावावेत. एसीचा वापर करताना त्या खोलीत टिव्ही, फ्रीज आदी वस्तू वापरणं कटाक्षानं टाळावं. कारण या वस्तूंमधून मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. त्यामुळे एसी लावण्यापूर्वी ही डिव्हायसेस बंद करावीत. तुम्हाला या वस्तू वापरायच्या असतील तर खोली थंड झाल्यावर त्या सुरू कराव्यात.

पोलीस चौकशीनंतर प्रवीण दरेकरांचा मोठा दावा, म्हणाले...)

एका संशोधनानुसार, तापमान अंशानं जरी वाढलं तरी सुमारे 6 टक्के वीज बचत होते. म्हणजेच तुम्ही तुमच्या एसीचं तापमान जितकं कमी ठेवाल, तेवढा वेळ त्यातला कॉम्प्रेसर (Compressor) काम करील आणि वीज बिल वाढेल. त्यामुळे तुम्ही एसी डिफॉल्ट तापमानात म्हणजेच 24 अंश सेल्सिअसवर सुरू ठेवला तर तुम्ही 24 टक्के विजेची बचत करू शकता.

जेव्हा तुम्ही खोलीत एसी सुरू करता तेव्हा खोली थंड होईपर्यंत खोलीतला पंखादेखील (Fan) सुरू केल्यास उपयोगी ठरेल. पंख्यामुळे एसीची हवा खोलीच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचेल आणि तुम्हाला एसीचं तापमान फार कमी करण्याची गरज भासणार नाही. तुम्ही एसीचं तापमान फार कमी केलं नाहीत तर विजेचा वापरही कमी होईल, परिणामी वीज बिल कमी येईल. एकूणच तुम्ही या सर्व टिप्सचा अवलंब करून एसीचा वापर केल्यास वाढीव वीजबिलाचं टेन्शन नक्कीच दूर होईल.

First published: