Home /News /technology /

आता WhatsApp वर वापरता येणार Instagram चं हे भन्नाट फीचर, पाहा काय होणार बदल

आता WhatsApp वर वापरता येणार Instagram चं हे भन्नाट फीचर, पाहा काय होणार बदल

WhatsApp वर युजर्ससाठी चॅटिंग प्रोसेस बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या WhatsApp आणत असलेलं हे फीचर इन्स्टाग्रामवर याआधीच देण्यात आलेलं आहे.

  नवी दिल्ली, 1 डिसेंबर : व्हॉट्सअ‍ॅप मागील काही दिवसांपासून नवनवीन फीचर्स (whatsapp new features today) अपडेट करत आहे. देशात व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आता WhatsApp वर युजर्ससाठी चॅटिंग प्रोसेस बदलणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सध्या WhatsApp आणत असलेलं हे फीचर इन्स्टाग्रामवर याआधीच देण्यात आलेलं आहे. WhatsApp वर येणार Instagram चं फीचर - व्हॉट्सअ‍ॅपने Android च्या बीटा युजर्ससाठी एक नवं अपडेट जारी केलं आहे. जारी करण्यात आलेल्या 2.21.24.8 या अपडेटमध्ये बीटा युजर्सला Instagram सारखंच WhatsApp युजर्सलाही मेसेजवर Emoji React करता येणार आहे.

  काही मिनिटात चार्ज होणार Realme चा हा स्मार्टफोन; लवकरच होणार लॉन्च, जाणून घ्या

  व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा युजर्सला याचा फायदा होईल. GSMArena ने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अनेक दिवसांपासून या फीचरवर काम करत असून यामुळे मेसेजवर वेगवेगळे इमोजी युजर्सला चॅटिंगच्या दरम्यान वापरता येणार आहे.

  रिचार्ज संपला तरी आता नो टेन्शन! Jio देणार काही सेकंदात Data Loan

  व्हॉट्सअ‍ॅपचे नवे अपडेट्स - व्हॉट्सअ‍ॅपने मागील काही दिवसांपूर्वी Disappearing Message आणि Privacy Settings मध्ये काही महत्त्वाचे बदल केले होते. व्हॉट्सअ‍ॅपने आपल्या बीटा यूजर्ससाठी (whatsapp beta version features) एक नवं अपडेट जारी केलं आहे.

  WiFi चा स्पीड स्लो झालाय? या ट्रिक्सने करा Boost, नेट होईल सुपरफास्ट

  ज्यात युजर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅप आयकॉन बदलण्यात येणार आहे. आता बीटा युजर्ससाठी नवा शॉर्ट (whatsapp icon change) कट देण्यात आला असून आता व्हॉट्सअ‍ॅप 2.21.24.6 व्हर्जनवर काम करेल.
  Published by:Atik Shaikh
  First published:

  Tags: Instagram, Whatsapp alert, WhatsApp features, Whatsapp News

  पुढील बातम्या