मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Elon Musk यांच्या टेस्ला कंपनीला दोन महिन्यांत Bitcoinsमधून करोडो डॉलर्सचा नफा

Elon Musk यांच्या टेस्ला कंपनीला दोन महिन्यांत Bitcoinsमधून करोडो डॉलर्सचा नफा

बिटकॉइनची विक्री करण्यामागचा उद्देश त्यांची लिक्विडिटी (Liquidity) सिद्ध करणं हा आहे असं एलॉन मस्क यांनी सांगितलं.

बिटकॉइनची विक्री करण्यामागचा उद्देश त्यांची लिक्विडिटी (Liquidity) सिद्ध करणं हा आहे असं एलॉन मस्क यांनी सांगितलं.

बिटकॉइनची विक्री करण्यामागचा उद्देश त्यांची लिक्विडिटी (Liquidity) सिद्ध करणं हा आहे असं एलॉन मस्क यांनी सांगितलं.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल : जगातल्या दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या टेस्ला (Tesla) या ई-कार कंपनीने (E-Car Company) जानेवारी2021मध्ये बिटकॉइन (Bitcoin) या क्रिप्टोकरन्सीमध्ये (Cryptocurrency) 1.5अब्ज डॉलर एवढी भरभक्कम गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीला दोन महिने होत आहेत तोपर्यंत या कंपनीने या गुंतवणुकीतून तब्बल 10.1 कोटी डॉलरची कमाई केली. मार्च 2021च्या तिमाहीची माहिती देताना टेस्ला कंपनीकडून सांगण्यात आलं, की बिटकॉइन्सच्या विक्रीतून कंपनीला 10.1 कोटी डॉलरची कमाई झाली आहे. टेस्ला कंपनीने आपल्याकडे असलेल्या बिटकॉइन्सपैकी 10 टक्के बिटकॉइन्सची विक्री केली आहे, असं मस्क यांनी सांगितलं. दरम्यान, मस्क यांनी बिटकॉइनमधील वैयक्तिक गुंतवणूक कायम राखली आहे.

    बिटकॉइनची विक्री करण्यामागचा उद्देश त्यांची तरलता म्हणजेच लिक्विडिटी (Liquidity) सिद्ध करणं हा आहे असं एलॉन मस्क यांनी सांगितलं. टेस्ला कंपनीने जानेवारीत बिटकॉइन्समध्ये 1.5 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीची घोषणा केली होती. तसंच, कंपनीने आपल्या ग्राहकांना बिटकॉइनच्या रूपात पेमेंट (Payment) करण्याची सोयही उपलब्ध करून दिली होती. तसं पाहायला गेलं, तर सुरुवातीला मस्क यांचं बिटकॉइनबद्दलचं मत प्रतिकूल होतं; मात्र नंतरच्या काळात त्यांचं या क्रिप्टोकरन्सी बद्दलचं मत बदललं. त्यामुळेच त्यांनी वैयक्तिक पातळीवर, तसंच त्यांच्या कंपनीनेही बिटकॉइन्समध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्याचा त्यांना चांगला फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.

    वाचा: मुंबईत या ठिकाणी उभं राहणार Tesla चं भारतातील पहिलं शोरूम

    क्लबहाउस (Clubhouse) या सोशल Appला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं, की 'खरं तर आठ वर्षांपूर्वीच ही हे डिजिटल चलन (Digital Currency) खरेदी करायला हवं होतं. बिटकॉइन ही चांगली गोष्ट आहे. मी त्यात गुंतवणूक करण्यास उशीर केला आहे; मात्र आता मी बिटकॉइन करन्सी असावी, या मताचा आहे.'

    बिटकॉइनची किंमत 65 हजार डॉलरच्या आसपास पोहोचली होती. गेल्या वर्षभरात त्याची किंमत सात पटींनी वाढली आहे.

    2020-21 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत टेस्लाची विक्री 10.3 अब्ज डॉलरची झाली. तसंच, या कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 74 टक्के वाढ होऊन ती 43.8 कोटी डॉलर्सवर पोहोचली. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पहिल्या तिमाहीत (First Quarter) कंपनीने 1,80,338 एवढ्या विक्रमी संख्येने कार्सची निर्मिती केली. तसंच, 1,84,777 कार्स डिलिव्हर केल्या. यंदा टेस्ला कंपनी भारतातही आपली शाखा सुरू करणार आहे. मस्क यांच्या या यशामुळे बिटकॉइन्सला जगभर मिळणाऱ्या प्रतिसादात वाढ होण्यास हातभार लागणार आहे.

    First published:

    Tags: Elon musk, Tesla