मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Elon Musk यांनी ट्विटरसोबतचा करार केला रद्द; आता कोर्टात पोहोचणार वाद, काय आहे कारण?

Elon Musk यांनी ट्विटरसोबतचा करार केला रद्द; आता कोर्टात पोहोचणार वाद, काय आहे कारण?

एसईसीमध्ये एलन मस्क यांनी सांगितलं की, ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या, ही खाती कॅप्चर करण्याच्या पद्धतींबद्दलची माहिती आणि कारवाई करणं, हे करार घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत.

    नवी दिल्ली 09 जुलै : टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटर $44 अब्ज (3.5 लाख कोटी) रुपयांत खरेदी करण्याचा करार पूर्णपणे रद्द केला आहे. बनावट खात्यांची खरी संख्या लपवून चुकीची आणि अर्धी अपूर्ण माहिती दिल्याने हा निर्णय घेतल्याचं मस्क यांचं म्हणणं आहे. एलन मस्कच्या वतीने यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) ला सांगण्यात आलं की, कराराच्या वेळी ट्विटरने करारामध्ये चुकीची माहिती दिली होती, ज्यामुळे $44 अब्जचा ट्विटर करार संपुष्टात येत आहे (Elon Musk Terminated His Deal To Buy Twitter). एसईसीमध्ये एलन मस्क यांनी सांगितलं की, ट्विटरवरील बनावट आणि स्पॅम खात्यांची संख्या, ही खाती कॅप्चर करण्याच्या पद्धतींबद्दलची माहिती आणि कारवाई करणं, हे करार घडवून आणण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. या संदर्भात मस्क आणि त्यांची टीम गेल्या 2 महिन्यांपासून सतत ट्विटरसोबत संपर्क साधून माहिती घेत होती. पण प्रत्येक वेळी ट्विटरचे बोर्ड एकतर माहिती देण्यास टाळाटाळ करत होते किंवा अर्धी अपूर्ण माहिती देत ​​होते. एका मेसेजमुळे महिलेनं गमावले 10 लाख रुपये; तुम्हालाही Whatsapp वर 'या'नावाने मेसेज आला असेल तर सावधान याच कारणामुळे टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याचा करार पूर्णपणे रद्द केला. यूएस सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशन (एसईसी) मध्ये एलन मस्क यांनी सांगितलं की त्यांनी 9 मे, 25 मे, मे, 6 जून, 17 जून आणि 29 जून रोजी 5 वेळा ट्विटर प्लॅटफॉर्मवर असलेल्या बनावट आणि स्पॅम खात्यांबद्दल माहिती मागितली. मात्र, ट्विटरने आधी नकार दिला आणि नंतर अर्धवट माहिती दिली. मस्क यांनी सांगितलं की ट्विटर बोर्ड त्या अर्धवट माहितीचा स्वतंत्र तपास करण्यास परवानगी देत ​​​​नाही, कारण त्यांनी API सर्चवर आर्टिफिशियल कॅप लावली होती. मस्क यांनी ही कॅप काढून टाकण्याची मागणी केली होती, पण तीही 6 जुलैपर्यंत हटवण्यात आली नाही. Android वापरणाऱ्यांनो सावधान! हा व्हायरस खाली करेल तुमचं बँक अकाऊंट, Microsoft चा इशारा मस्कच्या वतीने सांगण्यात आलं की कराराच्या वेळी ट्विटरने एसईसीला सांगितले होते की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर 5% बनावट आणि स्पॅम खाती आहेत. मात्र मस्कच्या टीमचा असा विश्वास आहे की ट्विटर खोटं बोललं आणि बनावट खात्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त आहे. मस्कच्या टीमच्या म्हणण्यानुसार, ट्विटर बरीच माहिती लपवत आहे कारण ट्विटरच्या कमाईपैकी 90% कमाई जाहिरातींमधून येते. यामुळेच मस्क यांनी ट्विटर बोर्डासोबतचा $44 बिलियनचा करार रद्द केला आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Elon musk, Twitter

    पुढील बातम्या