Home /News /technology /

जगातली सगळ्यात वेगवान इलेक्ट्रिक कार, Tesla Model S Plaid लवकरच लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

जगातली सगळ्यात वेगवान इलेक्ट्रिक कार, Tesla Model S Plaid लवकरच लॉन्च, पाहा किंमत आणि फिचर्स

अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला लवकरच त्यांची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार Model S Plaid ची डिलीव्हरी सुरू करणार आहे. टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवरून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

    मुंबई, 23 मे: अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला लवकरच त्यांची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार Model S Plaid ची डिलीव्हरी सुरू करणार आहे. टेस्लाचे (Tesla) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) यांनी ट्विटरवरून याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. तसेच या फ्लॅगशिप इलेक्ट्रिक सेडान कारची डिलिव्हरी येत्या 3 जूनपासून सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. डिलिव्हरी फेब्रुवारीऐवजी 3 जूनपासून करावी लागली, असंही मस्क यांनी म्हटलंय. Tesla Model S Plaid ही आतापर्यंतची जगातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार आहे. ही कार अवघ्या 1.9 सेकंदात 100 किलोमीटर ताशी वेग पकडू शकते. या कारचा डिलिव्हरी इव्हेंट 3 जून रोजी कॅलिफोर्नियातील कंपनीच्या फॅक्ट्रीमध्ये होईल. कशी आहे कार? टेस्लाने या इलेक्ट्रिक कारमध्ये (electric car) दोन व्हेरियंट (two variant) दिले आहेत. प्लेड व्हेरियंटमध्ये वापरलेली मोटर 1,020 hp ची पॉवर जनरेट करते. ही कार एकदा चार्जिंग केल्यानंतर 627 किलोमीटरपर्यंत अंतर पार करू शकते. तसेच ही कार अवघ्या 1.9 सेकंदात 100 किलोमीटर ताशी वेग पकडू शकते. या कारचा जास्तीत जास्त स्पीड 321 किलोमीटर प्रति तास आहे. या कारची किंमत जवळपास 83 लाख रुपये आहे. या कारच्या लाँग रेन्ज व्हेरियंटमध्ये ड्यूएल मोटरचा वापर केला गेला आहे. ही मोटर 670 Hp पॉवर जनरेट करते. पूर्ण चार्जिंग केल्यानंतर ही कार 663 किलोमीटरपर्यंत अंतर पार करू शकते. हा व्हेरियंट अवघ्या 3.1 सेकंदात 100 किलोमीटर ताशी वेग पकडू शकतो. टेस्लाने या कार व्हेरियंट्समध्ये कार्बन स्लीव्स रोटर्ससोबत येणाऱ्या हाय परफॉर्मन्स मोटर्सचा वापर केला आहे. दरम्यान, टेस्लाने भारतात आपली पहिली इलेक्ट्रिक कार लाँच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. कंपनीने मुंबईत आपले मुख्यालय सुरू केले आहे, तर कर्नाटकमध्ये प्लांट सुरू केला आहे. कंपनी आपल्या इलेक्ट्रिक कारची विक्री मॉडेल-3 सोबत सुरू करणार आहे. टेस्ला मॉडेल भारतात कंप्लिटली बिल्ट यूनिट (CBU) स्वरूपात येईल. या कारची भारतात किंमत जवळपास 55 लाख रुपये असू शकते. एकदा चार्ज केल्यावर ही कार 500 किमी अंतर पार करू शकते. तसंच गाडीचा टॉप स्पीड ताशी 162 किमी असेल.
    First published:

    पुढील बातम्या