• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • क्या बात है! अवघ्या 3.5 तासांत फुल चार्ज होणार 'ही' इलेक्ट्रिक बाईक; सिंगल चार्जमध्ये जाणार 160 किमी

क्या बात है! अवघ्या 3.5 तासांत फुल चार्ज होणार 'ही' इलेक्ट्रिक बाईक; सिंगल चार्जमध्ये जाणार 160 किमी

विशेष म्हणजे ही बाईक अवघ्या 3.5 तासांत फुल चार्ज होणार आहे. चला तर जाऊन घेऊया या बाईकचे फीचर्स.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींकडे (Petrol and diesel price) बघून आता इलेकट्रीक बाईक  (Electric bikes)आणि इलेकट्रीक गाड्या ही काळाची गरज झाली आहे. त्यात आता निरनिराळ्या कंपन्यांकडून नवनवीन इलेकट्रीक बाईक्स लाँच करण्यात त्यात आहेत. अशीच एक बाईक इलेक्ट्रिक व्हीकल कंपनी eBikeGo नं आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक स्कूटर Rugged (Rugged electric bike) ही भारतात लाँच केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक अवघ्या 3.5 तासांत फुल चार्ज होणार आहे. चला तर जाऊन घेऊया या बाईकचे फीचर्स. Rugged बाईक ही इलेक्ट्रिक बाईक्सच्या (Rugged electric bike Features) दुनियेत एक नवीन आणि भन्नाट बाईक आहे. ही बाईक अवघ्या 3.5 तासांत फुल चार्ज होते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तर एका सिंगल चार्जमध्ये ही बाईक तब्बल 160 किमोलिटर धावते असा दावाही कंपनीकडून करण्यात आला आहे. हे वाचा - तुमचा फोन Hack झालाय? या गोष्टींमुळे प्रायव्हसी धोक्यात; वेळीच ओळखा हॅकिंग स्कूटरमध्ये कंपनीनं 2kWh चा बॅटरी पॅक दिला आहे. त्याची विशेष गोष्ट म्हणजे तुम्ही स्कूटरच्या सीटवर बसल्यावर बॅटरी स्वॅपिंग स्टेशनवर पूर्ण चार्ज केलेली बॅटरी बदलू शकता. स्कूटरमध्ये कंपनीनं 3KW मोटर दिली आहे. यामुळे स्कूटरची टॉप स्पीड 70 किमी प्रतितास आहे. त्याचवेळी, ही स्कूटर एका चार्जमध्ये 160 किमी अंतर जाऊ शकते असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. या गाडीची डिक्कीही 30 लिटरची आहे. स्कूटरमध्ये स्टील फ्रेम आणि चेसिस आहे. ज्यामुळे ही एक स्थिर आणि हलक्या वजनाची स्कूटर आहे. त्याचबरोबर यात ओला स्कूटरसारखी सेन्सर टेक्नॉलॉजी वापरण्यात आली आहे. स्कूटरच्या चेसिसवर कंपनी 7 वर्षांची वॉरंटी देत ​​आहे. तर एकूण वॉरंटी 3 वर्षांची आहे. यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टीम, डिस्क ब्रेक, अलॉय व्हील आणि 4 पॉइंट आहेत. एकूणच ही इलेक्ट्रिक बाईक भारतात चांगलाच धुमाकूळ घालणार आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: