मुंबई, 20 मार्च : सध्या जगात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. भारतातही कोरोना दिवसेंदिवस पसरत चालला आहे. यामुळे सरकार आणि इतर कार्पोरेट कंपन्यां त्यांच्या कर्मचाऱ्यांनी कुठं प्रवास केला हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. अनेकदा स्वत:लाही आपण गेल्या महिन्यात कुठं फिरलो याची माहिती नसते. मात्र याबाबतीत गुगल आपल्याला मदत करू शकते.
गुगल मॅप्सचा वापर करून आपण कुठं प्रवास केला याची माहिती मिळते. कोणत्या दिवशी किती वाजता कोणत्या ठिकाणी होतो याच्या डिटेल्स यावरून मिळतात. या तंत्रज्ञानाचा वापर करून एखाद्याच्या प्रवासाची माहिती मिळू शकते.
तुम्ही ज्या ठिकाणी भेट देता ती सर्व माहिती गुगल साठवते. त्याचा एक मॅपही आहे. प्रत्येक अपडेट ठिकाणाचे नाव आणि वेळेसह गुगलकडे सेव्ह होते. ही माहिती तुम्हालाही चेक करता येते. यासाठी तुमच्या मोबाईलवरून किंवा कॉम्प्युटरवरून जीमेल लॉगइन करावं लागेल. त्यावर तुम्ही वर्ष, महिना, तारीख टाकून त्या दिवसभरात कुठे गेला होतात याची माहिती मिळेल. चेक करा गुगल टाइमलाइन
गुगल मॅप ओपन केल्यानंतर टॉपला उजव्या कोपऱ्यात प्रोफाइल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर अनेक पर्याय दिसतील. त्यावर युवर टाइमलाइन असा पर्याय दिसेल. टाइमलाइनवर क्लिक करताच तुम्हाला दिवस, ठिकाण, शहर यानुसार पर्याय दिले जातील. यातील पर्याय निवडून तुम्ही ट्रॅव्हल हिस्ट्री शोधू शकता. याचा वापर करून तुम्ही फक्त एखाद्या दिवसातली ट्रॅव्हल हिस्ट्री शोधू शकता.
हे वाचा : Coronavirus चा होणार फायदा! 75 हजार जणांचा जीव वाचेल असा संशोधकाचा दावा
एखाद्याने ट्रॅव्हल हिस्ट्रीचा पर्याय ऑफ करून ठेवला असेल तर त्याची माहिती मिळणार नाही. त्याला ऑफ करण्यासाठी सेटिंगमध्ये पर्सनल सेटिंगमध्ये जाऊन लोकेशन ऑफ करावं लागेल.
हे वाचा : बापरे! भारतात कम्युनिटीमार्फत कोरोनाचा प्रसार? रुग्णाचा स्रोतच सापडला नाही