नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : पृथ्वीला (Earth)एकच चंद्र आहे, असं आपण आतापर्यंत मानत होतो. पण आता, पृथ्वीला आणखी एक चंद्र (Moon)म्हणजे उपग्रह आहे, असा शोध लागलाय.
धुमकेतू आणि लघुग्रहाबद्दल संशोधन करणारी अमेरिकी संस्था कॅटालिना स्काय सर्व्हे (Catalina Sky Survey)ने अवकाशात फिरणारी एक वस्तू शोधली आहे. ही वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने पृथ्वीशी बांधलेली आहे. संशोधकांनी याला 2020 CD 3 असं नाव दिलं आहे.
कॅटालिना स्काय सर्व्हेच्या संशोधकांनी 19 फेब्रुवारीला पृथ्वीच्या जवळ एक वस्तू मंद गतीने फिरताना पाहिली. ग्रहासारखी दिसणारी ही वस्तू पृथ्वीच्या जवळ आहे आणि तिचा आकार चंद्रापेक्षा छोटा आहे. जगभरातल्या आणखी 6 वेधशाळांमधल्या संशोधकांनीही हा ग्रह पाहिला. या ग्रहाला 'मिनीमून' म्हणजेच लघुचंद्र म्हटलं जाऊ शकतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा नवा आणि अस्थायी लघुचंद्र 1.9 मीटर आणि 3.5 मीटर यांच्या मधल्या आकाराचा आहे. त्याचा हा आकार एका छोट्या कारएवढा आहे.
(हेही वाचा : Realme चा 5G फोन भारतात लाँच; पहिल्यांदाच वाढली एवढी किंमत)
लघुचंद्राबद्दल केलं ट्वीट
कॅटालिना स्काय सर्व्हेचे खगोलशास्त्रज्ञ कॅस्पर विर्कोज यांनी 19 फेब्रुवारीच्या रात्री याबद्दल एक ट्वीट केलं. मी आणि माझ्या कॅटालिना स्काय सर्व्हिसची सहकारी टेडी प्रुयने हिच्यासोबत हे संशोधन करून ही वस्तू शोधून काढली, असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. मिरर प्लॅनेट सेंटर या खगोलशास्त्रात संशोधन करणाऱ्या संस्थेने आपल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे, अंतराळातली ही वस्तू अस्थायी स्वरूपात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी बांधलेली आहे. सौर विकिरणांच्या दाबामुळे याबद्दलचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. या मिनिमून म्हणजे लघचंद्राची कक्षा स्थिर आहे. कदाचित हा ग्रह स्वत:हूनच पृथ्वीपासन वेगळा झाला असावा.
(हेही वाचा : Google च्या एका क्लिकवर करा फोन रिचार्ज, अँड्रॉइड यूजर्ससाठी आलं नवं फीचर)
अस्थायी चंद्र?
पृथ्वीच्या चंद्रापेक्षाही आणखी एक चंद्राचा शोध लागण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी 2006 मध्ये RH 120 नावाच्या पृथ्वीच्या एका उपग्रहाचा शोध लागला होता. हा RH 120 ग्रह सप्टेंबर 2006 ते जून 2007 या काळात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत राहिला. यानंतर तो पृथ्वीपासून वेगळा झाला. त्यामुळेच 2020 CD 3 अस्थायी असण्याची शक्यता आहे.
======================================================================================================