मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /काही मिनिटांत 500 रुपये कमावण्याची संधी, Smartphone वर हे App वापरुन करावं लागेल एक

काही मिनिटांत 500 रुपये कमावण्याची संधी, Smartphone वर हे App वापरुन करावं लागेल एक

तुमच्या स्मार्टफोनमधील एक App पैसे मिळवण्याची संधी देत आहे. 'फोनपे' (PhonePe) या पॉप्युलर App च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये 500 रुपये मिळवू शकता.

तुमच्या स्मार्टफोनमधील एक App पैसे मिळवण्याची संधी देत आहे. 'फोनपे' (PhonePe) या पॉप्युलर App च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये 500 रुपये मिळवू शकता.

तुमच्या स्मार्टफोनमधील एक App पैसे मिळवण्याची संधी देत आहे. 'फोनपे' (PhonePe) या पॉप्युलर App च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये 500 रुपये मिळवू शकता.

    नवी दिल्ली, 5 जानेवारी : सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक घरात किमान दोन ते तीन तरी स्मार्टफोन आहेत. काही घरांमध्ये तर प्रत्येक व्यक्तीकडे एक स्मार्टफोन (Smartphone) आहे. प्रत्येक व्यक्ती दिवसातील काही ठराविक वेळ फोनमध्ये घालवत असते. काहींना तर स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचं (social media) व्यसनच लागल्याची स्थिती आहे. ते दिवसभर सतत फोनमध्ये व्यस्त असतात. ब्लॉगर्स (Bloggers) वगळता इतरांना त्यातून काहीही फायदा होत नाही. मात्र, आता एका App च्या माध्यमातून तुम्हाला घरबसल्या पैसे कमावता (earn money) येणार आहेत. आता तुमच्या स्मार्टफोनमधील एक App पैसे मिळवण्याची संधी देत आहे. 'फोनपे' (PhonePe) या पॉप्युलर App च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या अगदी काही मिनिटांमध्ये 500 रुपये मिळवू शकता.

    ऑनलाईन ट्रान्झेक्शन (Online transaction) करण्यासाठी 'PhonePe' हे App लोकप्रिय आहे. अनेक स्मार्टफोन युजर या App चा वापर करताना दिसतात. या App पवर युजर्सला विविध प्रकारे कमिशन मिळू शकतं. आता PhonePe ने आपल्या युजर्ससाठी एक खास ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये युजर 500 रुपये मिळवू शकतात. जर तुम्ही PhonePe App एखाद्या व्यक्तीला रेफर केलं आणि त्या व्यक्तीने हे App वापरलं, तर तुम्हाला 100 रुपयांचा कॅशबॅक (Cashback) मिळणार आहे.

    जेव्हा समोरची व्यक्ती पहिल्यांदाच PhonePe वर युपीआयद्वारे (UPI) आपलं बँक अकाउंट अॅड करेल तेव्हाच तुम्हाला हा कॅशबॅक मिळू शकते. याशिवाय त्या व्यक्तीनं बँक अकाउंट अॅड करताना फक्त रेफरल कोडचाच (Referral code) वापर केलेला असावा. या दोन्ही अटी पाळून समोरच्या व्यक्तीने PhonePe वापरल्यास तुम्हाला 100 मिळतील. अशा प्रकारे तुम्ही रेफर केलेल्या पाच व्यक्तींनी जर PhonePe App वापरलं तर तुम्हाला 500 रुपये मिळतील.

    Car Driving शिकायचं आहे? Maruti Suzuki ने सुरू केले हे खास कोर्स, पाहा किती आहे फी

    आपल्या कॉन्टॅक्टमधील एखाद्या व्यक्तीला PhonePe रेफरल कोड पाठवण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

    - सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर PhonePe App ओपन करावं लागेल.

    - App ओपन केल्यानंतर ते खाली स्क्रोल करा आणि 'Refer And Earn 100' या पर्यायावर क्लिक करा.

    - त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. त्या पेजच्या मदतीने तुम्ही Facebook, WhatsApp, Twitter सारख्या इतर Apps च्या माध्यमातून PhonePe इतरांना रेफर करू शकता.

    Google Payवर सोनं खरेदी-विक्रीची संधी, ऑनलाईन ट्रान्झेक्शनसाठी पाहा सोपी प्रोसेस

    अशा प्रकारे तुम्ही PhonePe App च्या मदतीने 500 रुपये मिळवू शकता. PhonePe लाँच झाल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शननंतर युजरला ठराविक रक्कम रिवॉर्ड (Reward) म्हणून मिळत असे. नंतर PhonePe ने रक्कम देण्याची सुविधा बंद करून कुपन्सच्या रुपात रिवॉर्ड देण्यास सुरुवात केली. आता रेफरल कोड ऑफरच्या माध्यमातून पुन्हा पैसे मिळवण्याची संधी युजर्सला आहे.

    First published:

    Tags: Online payments, Smartphone, Tech news