मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता या वस्तू Online मागवता येणार नाही, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विक्रीवर बंदी

आता या वस्तू Online मागवता येणार नाही, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून विक्रीवर बंदी

कधी कधी फोन न वाजताही फोन आल्याचा भास होतो. वैद्यकीय भाषेत याला रिंगटोन एन्जायटी म्हटलं जातं.

कधी कधी फोन न वाजताही फोन आल्याचा भास होतो. वैद्यकीय भाषेत याला रिंगटोन एन्जायटी म्हटलं जातं.

लॉकडाउनमध्ये जर तुम्ही ऑनलाईन सामान ऑर्डर करत असाल, तर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. लॉकडाउनमध्ये जर तुम्ही मोबाईल (Mobile)किंवा लॅपटॉप (laptop) घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या याची ऑनलाईन डिलीव्हरी मिळणं शक्य नाही.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 10 मे: भारतात कोरोनाचा (Coronavirus) कहर सुरू असताना, याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाउन (Lockdown) करण्यात आलं आहे. लॉकडाउन काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या लॉकडाउनमध्ये जर तुम्ही ऑनलाईन सामान ऑर्डर करत असाल, तर विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. लॉकडाउनमध्ये जर तुम्ही मोबाईल (Mobile) किंवा लॅपटॉप (laptop) घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या याची ऑनलाईन डिलीव्हरी मिळणं शक्य नाही. तसंच स्मार्टफोन, लॅपटॉपची रिटेल दुकानंही सुरू करण्यास परवानगी नसल्याने या वस्तू खरेदी करता येणार नाहीत.

गाईडलाईन्स जारी -

ई-कॉमर्स (E-Commerce) कंपन्यांनुसार, लॉकडाउन असणाऱ्या राज्यांमध्ये त्यांना मोबाईल फोनसह इतर गॅजेट्सची विक्री करण्याची परवानगी नाही, त्यामुळे ते ऑर्डर घेऊ शकत नाही. महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांच्या लॉकडाउन गाईडलाईन्समध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे, की या काळात केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी केली जाईल. Amazon ने आपल्या वेबसाईटवर, सरकारी गाईडलाईन्सनुसार, आम्ही केवळ अत्यावश्यक सामानाचीच डिलीव्हरी घेत आहोत, असं लिहिलं आहे.

रिलायन्स (Reliance) डिजीटलनेही, सरकारी निर्बंधांमुळे या पिन कोडची डिलीव्हरी होल्डवर असून सरकारच्या आदेशानंतरच इतर डिलीव्हरी स्वीकारल्या जातील, असं सांगितलं आहे.

(वाचा - तुमच्या नावावर दुसरं कोणी सिमकार्ड वापरतंय का? असं ओळखा)

Flipkart Mobile App वरही, सरकारी नियमांनुसार, प्रत्येक झोनसाठी प्रोडक्टची उपलब्धता वेगवेगळी असेल, असं सांगितलं आहे.

विविध उद्योग संघटना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा सातत्याने उठवत आहेत. लॉकडाउन दरम्यान मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तूंची विक्रीही विलंब न करता सुरू करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.

(वाचा - Online न दिसताच करता येणार चॅटिंग; पाहा WhatsApp ची ही कमाल ट्रिक)

वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोणत्या वस्तूंचा आवश्यक आणि अनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश करायचा, ते राज्यांवर अवलंबून आहे. नंतर मोबाईल फोन आवश्यक वस्तूंच्या यादीत समाविष्ट केल्या जाऊ शकतात. परंतु सध्या किराणा सामान, हेल्थ प्रोडक्ट आणि पर्सनल केअर इत्यादी वस्तूंची ऑनलाईन डिलीव्हरी होत आहे.

First published:

Tags: Mobile Phone, Online shopping, Smartphone, Tech news