फेस्टिव्ह सेलमध्ये बंपर कमाई; ई-कॉमर्स साईट्सवर इतक्या कोटींच्या सामानाची विक्री

फेस्टिव्ह सेलमध्ये बंपर कमाई; ई-कॉमर्स साईट्सवर इतक्या कोटींच्या सामानाची विक्री

ऑनलाईन विक्री अधिक चांगली होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑनलाईन सामान तुलनेने स्वस्तात मिळत होतं. मोबाईल फोनच्या विभागात चांगल्या ऑफर्समुळे अधिक मागणी होती.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : ई-कॉमर्स कंपन्यांनी (E-Commerce Companies) आपल्या फेस्टिव्ह सेलदरम्यान पाच दिवसांत तब्बल 3.1 अब्ज डॉलर सामानाची विक्री केली आहे. रेडसीर कंसल्टिंगने (RedSeer Consulting) बुधवारी जारी केलेल्या रिपोर्टनुसार ही माहिती देण्यात आली आहे.

रेडसीरने अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि स्नॅपडीलचा फेस्टिव्ह सेल चार अब्ज डॉलरचा असण्याचा अंदाज वर्तवला होता. 15 ते 19 ऑक्टोबर 2020 दरम्यान ऑनलाईन फेस्टिव्ह सेलची चांगली सुरुवात झाली. जवळपास 4.5 दिवसात ई-कॉमर्स कंपन्यांनी 3.1 अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास 22000 कोटी रुपयांचे प्रोडक्ट विकले असल्याचं रेडसीरने म्हटलं आहे.

(वाचा - सावधान! ऑनलाइन शॉपिंग करताना नकली सामान देऊन होतेय फसवणूक, वाचा अशावेळी काय कराल)

रिपोर्टनुसार, मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी ऑनलाईन सेलला पहिल्या काही दिवसांत अधिक चांगला प्रतिसाद होता. ऑनलाईन विक्री अधिक चांगली होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे ऑनलाईन सामान तुलनेने स्वस्तात मिळत होतं. मोबाईल फोनच्या विभागात  चांगल्या ऑफर्समुळे अधिक मागणी होती. त्याशिवाय शहरी भागातून अधिक चांगला प्रतिसाद होता. फेस्टिव्ह सेलमध्ये, लॉकडाऊननंतर विक्रेत्यांना आपल्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी चांगली संधी मिळाली.

 (वाचा - पोरांना लागलं गेमचं वेड; मोबाईलवर गेम खेळण्यात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर)

यापूर्वी अमेझॉन इंडियाने, त्यांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सेलआधीच 48 तासांदरम्यान 1.1 लाख विक्रेत्यांना ऑर्डर मिळाल्या असल्याचं सांगितलं होतं. दरम्यान कोणत्याही ई-कॉमर्स कंपनीने सेलदरम्यान, त्यांना मिळालेल्या ऑर्डर्सच्या आकड्यांचा खुलासा केलेला नाही.

(वाचा - ऑनलाईन शॉपिंग करताना 'या' शब्दांचा अर्थ नीट समजून घ्या, अन्यथा होऊ शकते फसवणूक)

Published by: Karishma Bhurke
First published: October 22, 2020, 12:08 PM IST

ताज्या बातम्या