ड्रोनने कॅमेरा उडवण्याआधी 'हे' करा नाहीतर होऊ शकते अटक, केंद्राने दिले नवे आदेश

ड्रोनने कॅमेरा उडवण्याआधी 'हे' करा नाहीतर होऊ शकते अटक, केंद्राने दिले नवे आदेश

केंद्रीय मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार 31 जानेवारीपर्यंत ड्रोन रजिस्ट्रेशन केले नाही तर तुमच्यावर कायदेशिर कारवाई होऊ शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जानेवारी : केद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाने ड्रोन असलेल्या आणि ते उडवणाऱ्या सर्वांसाठी नवीन नियम लागू केला आहे. ड्रोनचे रजिस्ट्रेशन 31 जानेवारीपर्यंत करणं बधंनकारक आहे. जर नियमांचे उल्लंघन केलं आणि 31 जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन नाही केलं तर त्यांच्याविरुद्ध कायदेशिर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षात ड्रोनने झालेल्या हल्ल्यानंतर विमान वाहतूक मंत्रालयाने हे पाऊल उचललं आहे. ड्रोन रजिस्ट्रेशनला 14 जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. मंत्रालयाकडून यासंदर्भात एक नोटीसही जारी करण्यात आली आहे.

मंत्रालयाने म्हटलं आहे की, सरकारच्या असं निदर्शनास आलं आहे की, काही ड्रोन आणि ड्रोनचा वापर करणारे लोक नियमांचे उल्लंघन करतात. ड्रोन आणि ड्रोन वापरणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी स्वत:हून माहिती देण्याची संधी दिली जात आहे. ड्रोन असलेल्या प्रत्येक व्यक्तीला 31 जानेवारी 2020 पर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागेल.

वाचा : दीड जीबी इंटरनेट डेटाही पुरत नसेल तर करा 'हा' रिचार्ज!

ड्रोनसाठी ऑगस्ट 2018 मध्ये सीएआर लागू करण्यात आला होता. यानुसार ड्रोन मालकांसाठी एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर घ्याला लागतो. तसेच परमिट आणि इतर काही गोष्टींची परवानगी घेणं आवश्यक आहे. विमापरवानगी ड्रोन उडवणं हे कायद्याचं उल्लंघन आहे.

ड्रोन मालकांनी रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना दोन युनिक नंबर मिळतील. हे दोन नंबर असलेल्यांना ड्रोन जवळ बाळगता येणार आहे. 31 जानेवारी रजिस्ट्रेशनसाठी अंतिम तारीख आहे. ड्रोनचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी https://digitalsky.dgca.gov.in/ संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

वाचा : Kwid आणि S-Presso ला टक्कर देण्यासाठी येत आहे Tata ची छोटी SUV

Published by: Suraj Yadav
First published: January 14, 2020, 11:00 AM IST
Tags: drone

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading