• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • ड्रायव्हिंग लायसन्स, RC बाबत मोठी घोषणा; आता या तारखेपर्यंत वैध राहणार डॉक्युमेंट

ड्रायव्हिंग लायसन्स, RC बाबत मोठी घोषणा; आता या तारखेपर्यंत वैध राहणार डॉक्युमेंट

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यांना सांगितलं की, फिटनेस, परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणीकरण आणि इतर कागदपत्रांची वैधता वाढवण्यात आली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 मार्च : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी ड्रायव्हिंग लायसन्सबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी प्रमाणपत्र आणि परमिटसारख्या मोटर वाहन कागदपत्रांची वैधता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्यांना सांगितलं की, फिटनेस, परमिट, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणीकरण आणि इतर कागदपत्रांची वैधता वाढवण्यात आली आहे. हे कागदपत्र असे आहेत, ज्यांना लॉकडाउनमुळे वैधता वाढवता आली नाही आणि ज्या कागदपत्रांची वैधता 1 फेब्रुवारी 2020 रोजी संपुष्ठात आली आहे. तसंच 31 मार्च 2021 पर्यंत देखील ज्या वाहनांच्या कागदपत्रांची वैधता संपत असेल, तरीही ही 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ मानली जाईल.

  (वाचा - जुन्या वाहन मालकांसाठी खूशखबर! Scrappage Policy बाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा)

  यापूर्वीही वाढवण्यात आली डेडलाईन - मोटर वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटर वाहन नियमांसंबंधी कागदपत्रांची वैधता अनेकदा वाढवण्यात आली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राज्य सरकारांना असा सल्लाही दिला की, 1 फेब्रुवारीपासून वैधता संपलेली वाहनांची कागदपत्र 30 जून 2021 पर्यंत वैध मानली जातील.

  (वाचा - पुढील वर्षापासून बदलणार टोल कलेक्शनची प्रक्रिया, तुमच्यावर काय परिणाम होणार)

  दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी आता कठिण टेस्ट पास करणं आवश्यक असणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत सांगितलं की, 69 टक्के मिळवणाऱ्यांनाच ड्रायव्हिंग लायसन्स दिलं जाईल.

  (वाचा - आता ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी लागू होणार नवे नियम; जाणून घ्या काय होणार बदल)

  तसंच, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आता सेफ-सुरक्षित ड्रायव्हिंगबाबत कठोर नियम करणार आहे. विना हेल्मेट चालकांसाठी मंत्रालयाकडून एक नवं सिस्टम सुरू करण्यात येणार आहे. यात विना हेल्मेट चालकांचा फोटो शेअर केला जाईल आणि त्याचं चालान कापलं जाईल.
  Published by:Karishma Bhurke
  First published: