News18 Lokmat

आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स होणार स्मार्ट, 'हे' होतील फायदे

सरकार ड्रायव्हिंग लायसन्स (DL) बनवण्यासाठी काही नियम सोपे करतंय.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 04:44 PM IST

आता तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स होणार स्मार्ट, 'हे' होतील फायदे

मुंबई, 07 मे : सरकार ड्रायव्हिंग लायसन्स (DL) बनवण्यासाठी काही नियम सोपे करतंय. पुढच्या 5 महिन्यांनी म्हणजे 1 आॅक्टोबर 2019पासून ड्रायव्हिंग लायसन्स ( DL ) आणि वाहनांचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ( RC ) एकसारखं असेल. म्हणजे DL आणि RC चा रंग एकसारखाच असेल. त्यातली माहितीही सारख्याच ठिकाणी असेल. केंद्र सरकारनं  याचं पत्रकही काढलंय. देशात रोज जवळजवळ 32 हजार DL दिले जातात.तसंच 43 हजार गाड्या रजिस्टर्ड होतात. या नव्या DL किंवा RC साठी जादा 15-20 रुपये खर्च करावे लागणार नाहीत.

1 रुपयात खरेदी करा 24 कॅरेट सोनं, 'ही' आहे नवी योजना

1.तुमचं DL बदलणार - आता DL आणि RCमधल्या माहितीवर कुठलाही संभ्रम राहणार नाही. आतापर्यंत प्रत्येक राज्य आपल्या सोयीनुसार DL आणि RCचा फाॅर्मेट तयार करतं. त्यामुळे काही राज्यांच्या डीएलवर माहिती पुढच्या बाजूला तर काही राज्यांच्या डीएलवर मागच्या बाजूला असते. पण आता असं असणार नाही. सर्व राज्यांसाठी ते समान असेल.

'हा' व्यवसाय सुरू केलात तर रोज कमवाल 4 हजार रुपये

मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी मंत्रालयानं 30 आॅक्टोबर 2018ला ड्राफ्ट नोटिफिकेशन पाठवून सगळ्या पक्षांची मतं घेतली होती. सर्व पक्षांच्या मतांप्रमाणे सरकारनं नवं नोटिफिकेशन काढलंय.

Loading...


2. आता स्मार्ट होईल DL - या स्मार्ट ड्रायव्हिंग लायसन्स DL आणि RC मध्ये मायक्रोचिप आणि क्युआर कोड असतील. त्यामुळे भविष्यकाळात नियमांचं उल्लघन होण्याची शक्यता अजिबात नाही.

अक्षय तृतीयेनिमित्त 'इथून' खरेदी करा सोन्याचे दागिने, मिळेल 'मोठं' डिस्काउंट

या क्युआर कोडमुळे केंद्रीय आॅनलाइन डेटाबेसवरून ड्रायव्हर किंवा वाहनाचा आधीचा रेकाॅर्ड एका डिव्हाइसवरून वाचला जाईल.

ट्रॅफिक पोलीस त्यांच्याकडच्या डिव्हाइसमध्ये कार्ड टाकून क्युआर कोड स्कॅन करू शकतात. त्यामुळे गाडी आणि ड्रायव्हर यांचे सगळे डिटेल्स मिळू शकतात.

सर्व राज्यांना आता DL आणि RC सारखेच तयार करावे लागणार.


पुणे-सातारा महामार्गावर कारला भीषण आग पाहा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2019 04:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...