सोशल मीडियावर बलात्कार पीडितेचं नाव, फोटो शेअर करण्यापूर्वी हे वाचा

सोशल मीडियावर बलात्कार पीडितेचं नाव, फोटो शेअर करण्यापूर्वी हे वाचा

हैदराबादमध्ये देशाला हादरवून टाकणारी अशी सामुहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर देशभर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

  • Share this:

मुंबई, 01 डिसेंबर : देशाला हादरवून टाकणाऱ्या हैदराबादमधील सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर संतापाची लाट उसळली आहे. हैदराबादमधील पशुचिकित्सक तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिचा खून करण्यात आला. त्यानंतर तिला जाळण्यात आलं. यानंतर सोशल मीडियावर लोक संताप व्यक्त करत आहे. दरम्यान, लोक पीडितेचा फोटो आणि नाव शेअर करत आहेत. तज्ज्ञांनी म्हटलं आहे की, माहिती असताना किंवा अज्ञानामुळे सुद्धा सोशल मीडिया युजरकडून अशा कृत्याने बलात्कार पीडिता किंवा पीडित कुटुंबीयांच्या अधिकारांवर गदा येते.

याबाबत ह्यूमन राइट वॉचच्या रिपोर्टने म्हटलं की, देशात बलात्कार पीडिताच्या खासगीपणाच्या अधाकारबद्दल लोकांमध्ये म्हणावी तितकी जागरुकता नाही. याचा परिणाम पीडितेला न्याय मिळताना संघर्ष करावा लागतो.

भारतीय दंड संहिता कलम 228 नुसार लैंगिक छळ किंवा बलात्कार पीडितांची ओळख उघड करता येत नाही. पीडिताचे नाव छापणे किंवा प्रकाशित करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला दोषी ठरवलं जातं. या प्रकऱणी दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो.

पीडित व्यक्तीची माहिती, ओळख उघड केल्याने पीडित व्यक्तीच्या खासगी अधिकारांचे उल्लंघन होते. त्यानंतर समाजात वावरताना अनेक आव्हानं तसंच मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्याशिवाय ज्यांना याबाबतची माहिती नाही ते लोक बलात्कार पिडितेची ओळख उघड झाल्यास त्याचा गैरफायदाही घेऊ शकतात.

पीडितेची ओळख गुप्त ठेवणं जितंक गरजेचं आहे तितकंच ते कठीण होत चाललं आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणीच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार 2017 मध्ये देशात एकूण 32 हजार 559 बलात्कार झाले. त्यापैकी 93.1 टक्के प्रकरणांमध्ये आरोपी हे ओळखीचे आणि जवळचेच होते असं समोर आलं आहे.

याआधी 2012 मध्ये देशाला हादरवून टाकणारं निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणं घडलं होतं. तेव्हा भारतात नुकतीच सोशल मीडिया वापराला सुरुवात झाली होती. तेव्हा पीडितेची ओळख गुप्त रहावी यासाठी न्यायालयाने विशेष आदेश दिले होते. पीडितेच्या कुटुंबीयांकडून नाव सार्वजनिक व्हावं अशी मागणी असतानाही ती ओळख गुप्त राहिली हे विशेष.

Published by: Suraj Yadav
First published: December 1, 2019, 1:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading