Home /News /technology /

'या' 5 चुका करू नका, नाहीतर WhatsApp अकाउंट होईल बंद!

'या' 5 चुका करू नका, नाहीतर WhatsApp अकाउंट होईल बंद!

 कायदा आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन न करणाऱ्या 18.05 लाख भारतीयांचं अकाउंट (Account) व्हॉट्सअ‍ॅपने बंद केलं आहे.

कायदा आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन न करणाऱ्या 18.05 लाख भारतीयांचं अकाउंट (Account) व्हॉट्सअ‍ॅपने बंद केलं आहे.

कायदा आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन न करणाऱ्या 18.05 लाख भारतीयांचं अकाउंट (Account) व्हॉट्सअ‍ॅपने बंद केलं आहे.

    मुंबई, 03 मे : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) हा सर्वाधिक लोकप्रिय असलेला सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media Platform) आहे. देशातले कोट्यवधी लोक व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करतात. काही वेळी काही युजर्स व्हॉट्सअ‍ॅपचा चुकीचा वापर करताना दिसतात. असे युजर्स या माध्यमातून चुकीचे, आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मेसेज, फोटोज किंवा व्हिडिओ व्हायरल (Viral) करत असतात. या गोष्टी टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपनं कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. कायदा आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन न करणाऱ्या 18.05 लाख भारतीयांचं अकाउंट (Account) व्हॉट्सअ‍ॅपने बंद केलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप अशी कारवाई केव्हा करू शकतं, वारंवार अशी कारवाई टाळण्यासाठी काय करावं हे जाणून घेणं आवश्यक आहे. भारतात व्हॉट्सअ‍ॅपचे 49 कोटी युजर्स आहेत. त्यापैकी 18.05 लाख युजर्स अकाउंट व्हॉट्सअ‍ॅपने बंद केलं. यापूर्वी देखील कंपनीनं अशा प्रकारची कारवाई केलेली आहे. ही कारवाई नव्या आयटी कायद्यानुसार (IT Act) करण्यात आली आहे. या युजर्सवर कायदा आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे, अशी माहिती व्हॉट्सअ‍ॅपच्या मासिक अहवालात देण्यात आली आहे. अशा प्रकारची कारवाई व्हॉट्सअ‍ॅप केव्हा करतं हे माहिती असणं गरजेचं आहे. तसंच वारंवार अशी कारवाई टाळण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गदर्शक सूचनांविषयी माहिती असणंदेखील आवश्यक आहे,'टीव्ही 9 हिंदी'ने या विषयीची माहिती दिली आहे. जर व्हॉट्सअ‍ॅप ओपन केल्यानंतर मेसेज रिसीव्ह होत नसेल किंवा एरर दाखवत असेल तर तुमचं अकाउंट बंद केलं आहे, असं समजावं. अशाप्रकारे बंद झालेलं अकाउंट पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपच्या अधिकृत वेबसाइट किंवा अ‍ॅपच्या माध्यमातून रिक्वेस्ट करू शकता. यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सअ‍ॅप ओपन करावं. त्यानंतर सेटिंग मध्ये जाऊन 'हेल्प'वर टॅप करावं. 'कॉन्टॅक्ट अस'वर जाऊन आपली बाजू तुम्ही मांडू शकता. काही वेळा व्हॉट्सअ‍ॅप स्क्रिनवर हेल्प (Help) अर्थात मदतीचा मेसेज दिसतो. अशा आहेत व्हॉट्सअ‍ॅपच्या मार्गदर्शक सूचना जर तुम्ही एखाद्या युजरला मालवेअर (Malware) आणि फिशिंग लिंक (Fishing Link) पाठवत असाल आणि त्यामुळे त्याचे डिव्हाइस हॅक होण्याचा धोका किंवा नुकसान होण्याची शक्यता असेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला माहिती नसलेल्या लिंक फॉरवर्ड करणं टाळा. हिंसेला कारणीभूत ठरणारे फेक मेसेज किंवा व्हिडिओ, पॉर्न क्लिप किंवा धमकी देणारे मेसेज तुम्ही पाठवले तर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्या अकाउंटवर निर्बंध लादू शकतं. त्यामुळे अशा गोष्टी टाळाव्यात. एखाद्या अनोळखी नंबरवर वारंवार मेसेज पाठवणं, आपत्तीजनक गोष्टी ट्रान्सफर करणं किंवा कायदेशीर दृष्टीकोनातून गुन्हा असणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटी केल्यास तुमच्यावर व्हॉट्सअ‍ॅप कारवाई करू शकते. जर एकीकडे व्हॉट्सअ‍ॅप वापरत असताना तुम्ही दुसरीकडे कंपनीने जारी न केलेले थर्ड पार्टी अ‍ॅप (Third Party App) म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅप प्लस, व्हॉट्सअ‍ॅप बीटाचा वापर करत असाल तर तुमचं अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं. त्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरत असाल तर थर्डी पार्टी अ‍ॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करणं टाळा. जर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर अनेकजणांनी ब्लॉक केलं असेल तर व्हॉट्सअ‍ॅप तुमच्यावर नजर ठेवतं. अशा प्रकरणात सुरुवातीला तात्पुरत्या स्वरुपात अकाउंट बॅन केलं जातं. परंतु, त्यानंतरही ब्लॉक करणाऱ्यांची संख्या वाढत राहिली तर व्हॉट्सअ‍ॅप तुमचं अकाउंट कायमस्वरुपी बंद करू शकते.
    First published:

    पुढील बातम्या