Elec-widget

तुम्हीही हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकता, इंटरनेट वापरताना घ्या काळजी

तुम्हीही हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकता, इंटरनेट वापरताना घ्या काळजी

थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी मोठा फटका बसू शकतो. यामध्ये हॅकर्स पैसे किंवा इतर महत्वाची माहिती हडप करू शकतात.

  • Share this:

नवं तंत्रज्ञान आणि इंटरनेट क्रांती जितक्या वेगाने झाली तेवढेच त्यात धोकेसुद्धा निर्माण झाले आहेत. अनेकदा युजर्सच्या नकळत त्यांची माहिती चोरून त्याचा गैरवापर केला जातो. यासाठी हॅकर्सकडून वेगवेगळ्या कल्पना लढवल्या जातात. यात थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी मोठा फटका बसू शकतो. यामध्ये हॅकर्स पैसे किंवा इतर महत्वाची माहिती हडप करू शकतात.

एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, इंटरनेट सर्फिंगसाठी ब्राऊजर वापरतो त्यातून पाठवल्या जाणाऱ्या नोटिफिकेशन्स हे युजर्सना फसवण्यासाठीचं जाळं असू शकतं. ब्राऊजर पुश नोटिफिकेशन्स इंटरनेट ब्राउज करणाऱ्या युजर्सना दिसतात. अनेक वेबसाइटवर जाताच त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला पाठवण्याबाबत विचारलं जातं. तेव्हा परवानगी दिल्यानंतर ही नोटिफिकेशन्स पाठवली जातात.

नोटिफिकेशन्समधून हॅकर्स त्यांच्या लिंक्स पाठवतात. यामध्ये फेक पेजची लिंक असते ज्यामध्ये एखादी ऑफर दिलेली असते. त्यामध्ये तुमची माहिती मागितली जाते. अनेकदा अशा लिंकमध्ये लॉटरीचे आमिष दाखवलं जातं. जानेवारी 2017 मध्ये अशा नोटिफिकेशन्समधून 17.2 लाख लोकांना टार्गेट करण्यात आलं. तर सप्टेंबर 2019 मध्ये हाच आकडा तिप्पट झाला असून 55.4 लाख लोकं पुश नोटिफिकेशनच्या जाळ्यात अडकले आहेत.

हॅकर्सच्या या जाळ्यात अडकू नये यासाठी इंटरनेट वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. तुम्ही फक्त अशाच साइटच्या नोटिफिकेशनला परवानगी द्या ज्या ट्रस्टेड असतील. गेल्या काही महिन्यांमध्ये पुश नोटिफिकेशनच्या माध्यमातून हॅकर्सनी केलेल्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या फीचरमुळे युजर्सना सहज लिंक पाठवता येतात. ज्या साइट ट्रस्टेड आहेत आणि गरजेच्या आहेत त्यांचेच नोटिफिकेशन ऑन ठेवा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 30, 2019 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com