मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

सावधान! Google वर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी; अन्यथा क्षणात अकाउंट होईल रिकामं; वाचा सविस्तर

सावधान! Google वर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी; अन्यथा क्षणात अकाउंट होईल रिकामं; वाचा सविस्तर

गुगल हे जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे; मात्र याचा वापर कधी-कधी तुम्हाला संकटात टाकू शकतो.

गुगल हे जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे; मात्र याचा वापर कधी-कधी तुम्हाला संकटात टाकू शकतो.

गुगल हे जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे; मात्र याचा वापर कधी-कधी तुम्हाला संकटात टाकू शकतो.

मुंबई, 28 मार्च: सध्या इंटरनेट (Internet) ही आपल्या दैनंदिन आयुष्यातली एक मूलभूत गरज झाली आहे. जगाच्या पाठीवरच्या कोणत्याही गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इंटरनेचा वापर केला जातो. यासोबतच सध्या मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन (Digitization) झाल्यामुळेही इंटरनेचा वापर करणं गरजेचं ठरत आहे. इंटरनेटचा वापर करताना प्रायव्हसीसोबत (Privacy) काही प्रमाणात तडजोड करावीच लागते. बहुतेक इंटरनेट युझर्स (Internet User) 'गुगल'चा (Google) वापर करतात. गुगल हे जगातलं सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन आहे; मात्र याचा वापर कधी-कधी तुम्हाला संकटात टाकू शकतो. अशा काही गोष्टी आहेत ज्या गुगलवर सर्च करणं धोकादायक (Avoid these to search on Google) ठरू शकतं. 'झी न्यूज'नं याबाबतची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. सोशल मीडिया अकाउंट अनेकांना अ‍ॅपऐवजी (App) ब्राउझरचा वापर करून सोशल मीडिया (Social Media) अकाउंट लॉग इन (Log In) करण्याची सवय असते. असं करणं टाळलं पाहिजे. गुगलवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचं नाव टाकून शोधण्याऐवजी थेट प्लॅटफॉर्मची अधिकृत यूआरएल (URL) टाकणं अधिक सुरक्षित ठरेल. अन्यथा तुमचं अकाउंट हॅक (Hacking) होण्याची शक्यता असते. सर्व Toll Plaza हटवले जाणार, भारत सरकारचं मोठं पाऊल; नितीन गडकरींनी दिली माहिती बँकिंग वेबसाइट्स तुम्हाला तुमच्या बँकेच्या अधिकृत वेबसाइटची (Official Bank Website) अधिकृत URL माहीत नसेल, तर थेट गुगलवर बँकेची वेबसाइट शोधू नका. गुगलवर बँक वेबसाइट शोधण्याचा प्रयत्न केल्यास फिशिंगची (Phishing) शक्यता खूप वाढते. तुमच्याकडून चुकून बँकेच्या अधिकृत वेबसाइटप्रमाणे दिसणाऱ्या वेबसाइटवर तुमच्या बँकेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड टाकला जाऊ शकतो. अशा प्रकारे, तुम्ही अगदी सहजपणे फिशिंगचे बळी होऊ शकता आणि तुमच्या खात्यातले पैसे गमावू शकता. अ‍ॅप्सच्या डाउनलोड लिंक्स थर्ड पार्टी अ‍ॅप्स (Third Party Apps) तुमचा स्मार्टफोन (Smartphone) किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी धोकादायक ठरू शकतात. कदाचित ही गोष्ट तुम्हाला माहितीही असेल. त्यामुळे गुगलवर थर्ड पार्टी अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअरच्या डाउनलोड लिंक्स (Download Links) शोधण्याचा कधीही प्रयत्न करू नका. त्याऐवजी प्ले स्टोअर (Play Store) आणि अ‍ॅप्स स्टोअरसारख्या अधिकृत सोर्सेसचा वापर करून ती डाउनलोड करा. तुमचं कॅन्सल झालेलं Ration Card कसं कराल अ‍ॅक्टिव्ह? पाहा प्रोसेस कंपन्यांचे कस्टमर केअर नंबर कस्टमर केअर नंबर (Customer Care Number) सर्च हा गुगलवरचा अतिशय कॉमन स्कॅम (Scam) आहे. यामध्ये, बनावट वेबसाइट्सवर बनावट बिझनेस लिस्टिंग आणि कस्टमर केअर नंबर पोस्ट केले जातात. त्यांचा वापर करून फसवणूक केली जाऊ शकते. तुम्हाला एखाद्या कंपनीचा कस्टमर केअर नंबर पाहिजे असेल, तर अधिकृत वेबसाइटवरून, मोबाइल अ‍ॅपवरून किंवा ऑफलाइन स्टोअरवरून नंबर शोधण्याचा प्रयत्न करा. पर्सनल फायनान्स आणि स्टॉक मार्केटशी संबंधित सल्ले पर्सनल फायनान्ससाठी (Personal Finance) सल्ले देणारे अनेक तज्ज्ञ (Experts) आहेत. त्यामुळे गुगलवर सल्ले शोधण्याऐवजी प्रत्यक्षात त्यांचा सल्ला घ्यावा. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, की अशी कोणतीही गुंतवणूक योजना (Investment plan) कमी कालावधीत श्रीमंत करत नाही. त्यामुळे अशा कुठल्याही योजनांना बळी पडू नये. गुंतवणूक करताना गुगलवरचे सल्ले टाळा. सरकारी वेबसाइट्स महानगरपालिका कर विभाग (Municipal Tax Department) आणि सरकारी रुग्णालयांसारख्या (Government Hospitals) सर्व सरकारी वेबसाइट्स स्कॅमर्सच्या (Scammers) टार्गेटवर असतात. कोणती वेबसाइट खरी आहे आणि कोणती खोटी हे ओळखणं कठीण आहे. त्यामुळं गुगलवर शोधण्याऐवजी थेट सरकारी वेबसाइटवर जाण्याचा पर्याय निवडा. Google Chrome मध्ये Search Suggestion कसं कराल बंद, पाहा सोपी प्रोसेस आजारपणांची लक्षणं तब्येत ठीक नसेल, तर गुगलवर त्याबाबत माहिती शोधण्याऐवजी थेट डॉक्टरांशी (Doctor) संपर्क साधा. गुगलवर शोधून सापडलेल्या माहितीवर विश्वास ठेवू नका. याशिवाय, गुगलवर मिळालेल्या माहितीच्या आधारे उपचार घेणं आणि औषधं घेणंदेखील धोकादायक ठरू शकतं. फ्री अँटीव्हायरस अ‍ॅप्स आजकाल हॅकर्स फ्री अँटीव्हायरस अ‍ॅप्स (Free Antivirus Apps) आणि सॉफ्टवेअरच्या नावाखाली डेटा आणि पैसे चोरत असल्याच्या अनेक घटना उघडकीस आलेल्या आहेत. यापासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल, तर गुगलवर 'फ्री अँटीव्हायरस अ‍ॅप्स किंवा सॉफ्टवेअर' शोधू नका. डिस्काउंट कोड्स ऑनलाइन खरेदी (Online Shopping) करताना सवलतीसाठी विशेष कूपन कोड मिळाला तर तो सुरक्षित असतो. परंतु, जास्त सवलत मिळवण्याच्या नादात गुगलवर कधीही कूपन कोड (Coupon Code) शोधू नका. कारण, अशा प्रकारे तुम्ही बनावट वेबसाइट्सवर जाऊ शकता. त्या ठिकाणी तुम्हाला कमी किमतीत बनावट कूपन विकली जाऊ शकतात. त्यासोबत तुमचे बँकिंग डिटेल्स चोरीला जाऊ शकतात Ration Card :रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, Aadhaar Link बाबत मोठी घोषणा ई-कॉमर्स वेबसाट्स आणि ऑफर्स देशातल्या सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्स (E-commerce websites) आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर आणत असतात. परंतु, या प्लॅटफॉर्मची बनावट पेजेस तयार करण्यात आल्याचंही अनेकवेळा घडलं आहे. ती पेजेस इतकी हुबेहूब असतात की लवकर आपल्या लक्षातही येत नाहीत. अशी बनावट पेजेस टाळण्यासाठी, थेट प्लॅटफॉर्मची URL एंटर करा किंवा अ‍ॅप वापरा. वरील दहा गोष्टी गुगलवर सर्च केल्यास तुमची पर्सनल माहिती लीक होण्याचा किंवा तुमची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळं गुगलवर सर्च करताना काळजी घेतली पाहिजे.
First published:

Tags: Financial fraud, Google, Technology

पुढील बातम्या