Home /News /technology /

Smartphone: स्मार्टफोन वापरल्यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष

Smartphone: स्मार्टफोन वापरल्यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष

Smartphone: स्मार्टफोन वापरल्यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष

Smartphone: स्मार्टफोन वापरल्यामुळं स्मरणशक्तीत वाढ होते? अभ्यासातून समोर आले आश्चर्यकारक निष्कर्ष

smartphones effect on human memory: डिजिटल डिव्हायसेसमुळे लोकांना अत्यंत महत्त्वाची माहिती साठवण्यात आणि लक्षात ठेवण्यात मदत होते, असं एका अभ्यासात समोर आलं आहे.

मुंबई, 3 ऑगस्ट: अलीकडच्या काळात आपलं स्मार्टफोनवरील अवलंबित्व वाढलं आहे. स्मार्टफोनमुळं आपल्याला बधिरता तर आली नाही ना, यावर अनेक तर्क वितर्क लढवले जातात. स्मार्टफोनमधील मेमरीमध्ये सर्वकाही साठवलं जात असल्यानं आपल्याला फोन नंबर किंवा अन्य गोष्टी लक्षात ठेवण्याची फारशी गरज पडत नाही. पण फक्त स्मार्टफोनच (Smartphones) नाही तर स्मार्टवॉचेस (Smart watches) आणि अन्य डिजिटल डिव्हायसेसमुळं (Digital Devices) व्यक्तीचं स्मरणशक्ती कौशल्य वाढतं असं UCL संशोधकांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून समोर आलं आहे. जर्नल ऑफ एक्सपरिमेंटल सायकॉलॉजी: जनरल (Journal Of Experimental Psychology) या जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित करण्यात आला आहे. या डिजिटल डिव्हायसेसमुळे लोकांना अत्यंत महत्त्वाची माहिती साठवण्यात आणि लक्षात ठेवण्यात मदत होते, असं या अभ्यासात म्हटलं आहे. त्यामुळे आपोआपच कमी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी त्यांची स्मरणशक्ती वापरतात ,असं संशोधकांचं म्हणणं आहे.
तंत्रज्ञानाच्या अतिवापरामुळे काही क्षमता म्हणजेच कॉग्निटिव्ह ॲबिलिटीज (Cognitive Abilities) नष्ट होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे डिजिटल डमेन्शिया(Digital Dementia) होऊ शकतो अशी भीती न्यूरोसायंटिस्टनी याआधी व्यक्त केली होती. मात्र डिजिटल डिव्हाईसचा बाह्य स्मरणशक्ती (External Memory) म्हणून वापर केल्यास त्यामुळे लोकांना फक्त डिव्हाईसमध्ये साठवण्यात आलेली माहिती आठवण्यात मदत होते असं नाही तर काही न साठवलेली माहितीही यामुळे आठवण्यामध्ये Digital Device ची मदत होते असं या संशोधनातून पुढं आलं आहे.
हे दाखवून देण्यासाठी संशोधकांनी एक मेमरी टास्क विकसित केला. टचस्क्रीन डिजिटल टॅब्लेट किंवा कंम्प्युटरवर हा मेमरी टास्क (Memory Task) देण्यात आला. 18 ते 71 वर्ष वयोगटातील स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात आली. यातील सहभागी लोकांना स्क्रीनवर नंबर असलेले 12 सर्कल्स (वर्तुळं) दाखवण्यात आली. काही सर्कल्स डावीकडे तर काही उजवीकडे होती. त्यांना लक्षात असलेली सर्कल्स योग्य बाजूला खेचल्यास तेवढे पैसे त्यांना प्रयोगाच्या शेवटी दिले गेले. यातील एक बाजू ‘हाय व्हॅल्यू’ (जास्त महत्त्वाची) म्हणून ठेवण्यात आली होती. याचा अर्थ त्या बाजूला सर्कल खेचलं तर ‘लो व्हॅल्यू’ (कमी महत्त्वाची) या बाजूला असलेल्या खेचलेल्या सर्कलपेक्षा 10 पट जास्त रक्कम दिली जात होती, अशा पद्धतीने हा टास्क तयार करण्यात आला होता. हा टास्क सहभागी लोकांना 16 वेळा करण्यात सांगण्यात आलं. चाचणीच्या अर्ध्यावेळात त्यांना लक्षात ठेवण्यासाठी त्यांची स्वत:ची स्मरणशक्ती वापरावी लागली आणि उरलेल्या अर्ध्यासाठी त्यांना त्यांच्या डिजिटल डिव्हायसेसवर रिमांईंडर सेट करण्याची परवानगी देण्यात आली होती.
ज्या हाय व्हॅल्यू सर्कल्सबद्दलची माहिती साठवण्यासाठी अनेक सहभागी लोकांनी डिजिटल डिव्हायसेसचा वापर केला असं निष्कर्षातून लक्षात आलं. जेव्हा त्यांनी असं केलं तेव्हा त्या सर्कल्सची मेमरी जवळपास 18% नी वाढल्याचं लक्षात आलं. तर लो व्हॅल्यू सर्कल्सची मेमरीही 27% टक्क्यांनी वाढली होती. ज्या लोकांनी लो व्हॅल्यू सर्कल्ससाठी रिमाईंडर सेट न करूनही ही स्मरणशक्ती वाढल्याचं लक्षात आलं.
मात्र रिमाईंडर्स वापरण्याची किंमतही मोजावी लागते हे या निष्कर्षातून लक्षात आलं. जेव्हा हे रिमाईंडर्स काढून घेण्यात आले, तेव्हा लोकांना कमी महत्त्वाची सर्कल्स ही जास्त महत्त्वाच्या सर्कल्सपेक्षा जास्त चांगली लक्षात राहिल्याचं समोर आलं. त्यांनी त्यांच्या डिव्हायसेसवर ही जास्त महत्त्वाची माहिती सोपवली आणि नंतर ते विसरून गेले. “डिजिटल डिव्हायसेसवर साठवलेली माहिती ही स्मरणशक्ती कौशल्यावर कशा प्रकारे परिणाम करू शकते हे आम्हाला बघायचं होतं,” असं संशोधनातील सीनिअर ऑथर डॉ. सॅम गिल्बर्ट (UCL Institute of Cognitive Neuroscience) यांनी सांगितलं. “जेव्हा लोकांना बाह्य स्मरणशक्ती वापरण्याची परवानगी देण्यात आली, तेव्हा डिव्हायसमध्ये साठवलेली माहिती लक्षात ठेवण्यात ती डिव्हायसेस त्यांना मदत करतात, असं आमच्या लक्षात आलं. खरं तर हे आश्चर्यकारक आहे, पण या डिव्हाइसमुळे लोकांनी सेव्ह न केलेली माहिती लक्षात ठेवण्याची स्मरणशक्तीही वाढल्याचं आमच्या लक्षात आलं.”
“ डिव्हाईस वापरल्यामुळे लोकांनी त्यांची स्मरणशक्ती जास्त महत्त्वाची माहिती विरुद्ध कमी महत्त्वाची माहिती संग्रहित करण्यासाठी वापरली. जेव्हा लोकांना स्वत:हून काही गोष्टी लक्षात ठेवायच्या होत्या, तेव्हा त्यांनी स्मरणशक्तीची क्षमता सर्वांत जास्त महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्यासाठी वापरली. पण जेव्हा त्यांनी डिव्हाईस वापरलं तेव्हा त्यांनी त्यांनी जास्त महत्त्वाची माहिती डिव्हाईसमध्ये साठवली आणि त्यांची स्वत:ची स्मरणशक्ती कमी महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्यासाठी वापरली.”
“ बाह्य मेमरी टूल्सचा उपयोग झाल्याचं परिणामांवरून दिसून आलं. डिजिटल डिमेन्शिया होणं तर दूरच पण आपण जी माहिती कधीही साठवलेली नाही त्यासाठी बाह्य मेमरी डिव्हाईसेसचा खूप उपयोग होतो. पण आपण सर्वांत महत्त्वाची माहिती साठवल्याचा बॅक अप घेतला आहे ना हे पाहणं खूप आवश्यक आहे. नाहीतर जर मेमरी टूल्स अपयशी ठरले तर आपल्याकडे फक्त कमी महत्त्वाची माहिती साठवलेली असेल, ” असंही त्यांनी सांगितलं.
या संशोधनासाठी ESRC नं आणि Independent Research Fund Dnmark नं निधी दिला होता. एरवी डिजिटल डिव्हाईसेसमुळे लक्षात ठेवण्याची सवय गेली असं म्हटलं जातं. त्या पार्श्वभूमीवर हे निष्कर्ष नक्कीच धक्कादायक आहेत.
First published:

Tags: Smartphone, Smartphones

पुढील बातम्या