• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • विमानाला हॉर्न असतं का? 'या' कारणांसाठी होतो वापर

विमानाला हॉर्न असतं का? 'या' कारणांसाठी होतो वापर

हा हॉर्न सामान्य वाहनांच्या हॉर्नसारखाच असतो. हा हॉर्न विमानाच्या चाकाजवळ असतो. या हॉर्नच्या आवाजात फरक असतो.

हा हॉर्न सामान्य वाहनांच्या हॉर्नसारखाच असतो. हा हॉर्न विमानाच्या चाकाजवळ असतो. या हॉर्नच्या आवाजात फरक असतो.

हा हॉर्न सामान्य वाहनांच्या हॉर्नसारखाच असतो. हा हॉर्न विमानाच्या चाकाजवळ असतो. या हॉर्नच्या आवाजात फरक असतो.

 • Share this:
  मुंबई, 18 सप्टेंबर : रस्त्यावर वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली, की निरनिराळ्या वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न (Horn) आपल्या कानावर पडतात. आधीच वाहनांचे आवाज आणि त्यात पुन्हा हॉर्नचा आवाज यामुळे अनेकदा आपण वैतागून जातो. याशिवाय ध्वनिप्रदूषणात भर पडते ती निराळीच. कारण काही वाहनांचे हॉर्न अत्यंत कर्णकर्कश असतात.  वाहनांप्रमाणेच रेल्वेलाही (Railway) विविध प्रकारचे हॉर्न असतात. यातला प्रत्येक हॉर्न वाजवण्यामागे वेगवेगळा अर्थ दडलेला असतो. अर्थात रेल्वेचे हॉर्न हे देखील अलर्ट म्हणूनच वापरले जातात. वाहनं आणि रेल्वेत हॉर्न असतात, तसेच हॉर्न विमानाला (Airplane) असतात का? असतील, तर ते केव्हा आणि कशासाठी वाजवले जातात, असा प्रश्न तुमच्या मनात कधी ना कधी आलाच असेल. विमानालाही हॉर्न असतात आणि त्यांची कार्यप्रणाली आणि ते वाजवण्यामागील अर्थ वेगवेगळा असतो. वाहनं आणि रेल्वेप्रमाणेच विमानांमध्येही हॉर्न असतात, ही बाब कदाचित फार कमी जणांना माहिती असेल. अगदी तांत्रिकदृष्ट्या विमानांमध्ये हॉर्न असतात. परंतु, हे हॉर्न सर्वसामान्य वाहनांच्या तुलनेत थोडे वेगळे असतात. पक्ष्यांना बाजूला करण्यासाठी हे हॉर्न नक्कीच वाजवले जात नाहीत. तसंच विमान हवेत असतानाही हे हॉर्न वाजवले जात नाहीत. न्यूझीलंडनंतर आणखी एक टीम पाकिस्तानला धक्का द्यायच्या तयारीत, फायदा IPL चा होणार विमानाचे हॉर्न हे अलार्म बटण (Alarm Button) किंवा अलर्ट (Alert) म्हणून काम करतात. या हॉर्नपैकी एक हॉर्न हा विमान ग्राउंडवर असताना वापरला जातो. या हॉर्नद्वारे ग्राउंड स्टाफला विमान उड्डाणासाठी तयार असल्याची माहिती दिली जाते आणि त्यानंतर विमानाचं उड्डाण होतं. हा हॉर्न सामान्य वाहनांच्या हॉर्नसारखाच असतो. हा हॉर्न विमानाच्या चाकाजवळ असतो. या हॉर्नच्या आवाजात फरक असतो. विमानाच्या हॉर्नचा आवाज कसा असावा, ही बाब संबंधित विमान उत्पादक कंपनीवर अवलंबून असते, असं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने दिलं आहे.

  मालकीणीवरील अत्याचाराचा पोपट ठरला साक्षीदार; कोर्टाला सांगितला घडलेला प्रकार

  याशिवाय विमानात अजून एक हॉर्न असतो. या हॉर्नचा वापर विमान आणि अन्य स्टाफ दरम्यान संपर्कासाठी (Communication) केला जातो. याचाच अर्थ हॉर्नच्या माध्यमातून केबिनमधली व्यक्ती अन्य स्टाफशी संपर्क साधते. काही अडचण किंवा अडथळा निर्माण झाल्यास स्टाफला या हॉर्नच्या माध्यमातून अलर्ट केलं जातं. एकूणच विमानात हॉर्न असले, तरी त्याचा वापर केव्हा करायचा याबाबतचे नियम ठरलेले असतात.
  First published: