Home /News /technology /

रुग्णांच्या इलाजासाठी हे डॉक्टर करतात iPhone 13 Pro Max चा वापर, सांगितलं थक्क करणारं कारण

रुग्णांच्या इलाजासाठी हे डॉक्टर करतात iPhone 13 Pro Max चा वापर, सांगितलं थक्क करणारं कारण

iphone ची सर्वांमध्ये मोठी क्रेझ असली तरी एखाद्या डॉक्टरने रुग्णाच्या इलाजासाठी iPhone वापरल्याचं कधी ऐकलंय का?

  नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर : Apple ने मागील महिन्यात iPhone 13 सीरिज लाँच केली. यात iPhone 13 Pro आणि iPhone 13 Pro Max च्या एन्ट्रीसह, Apple ने एक फोटोग्राफी फीचरही आणलं आहे. या फीचरच मॅक्रो फोटोग्राफीचं आहे. Apple चे High end model जबरदस्त कॅमेरासाठी पॉप्युलर आहेत. आयफोनची सर्वांमध्ये मोठी क्रेझ असली तरी एखाद्या डॉक्टरने रुग्णाच्या इलाजासाठी iPhone वापरल्याचं कधी ऐकलंय का? एक नेत्ररोग तज्ज्ञ iPhone 13 pro max चा वापर डोळ्यांसंबंधी रोगांचं निदान करण्यासाठी करतात. Apple ने नुकत्याच लाँच केलेल्या iPhone 13 pro max चा वापर रुग्णांच्या इलाजासाठी नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. टॉमी कॉर्न यांनी केल्याचं लिंक्डइनवर शेअर केलं आहे. यासाठी ते iPhone 13 pro max च्या मॅक्रो मोडचा वापर करतात. डॉक्टर आपल्या रुग्णांच्या डोळ्यांचे फोटो iPhone 13 pro max च्या मॅक्रो मोडमधून कॅप्चर करतात, जे मेडिकल कंडिशन आणि आजारला अधिक योग्यरित्या समजण्यासाठी मदत करू शकतात. या डॉक्टरांनी कशाप्रकारे रुग्णांच्या आजाराचं निदान करण्यासाठी स्मार्टफोनचा मॅक्रो मोड मदतशीर आहे हे सांगितलं आहे.

  iPhone 13 Mini नव्या सीरिजमधील सर्वात स्वस्त आयफोन, जबरदस्त कॅमेरासह मिळेल 512 GB पर्यंत स्टोरेज; काय आहे किंमत

  Apple ने iPhone 13 Pro Max वर मॅक्रो फोटोग्राफीसाठी नव्या लेन्सचा वापर न करता, कंपनीने अल्ट्रा वाइड अँगल कॅमेराचा वापर केला आहे. हा कॅमेरा दोन सेंटीमीटरच्या जवळच्या वस्तूचे फोटो क्लिक करण्याच्या क्षमतेसह आहे.

  Apple event : जुनी बाटली नवी दारू, अखेर iphone 13 लाँच, काय आहे नवं?

  डॉक्टर कॉर्न यांनी अशा रुग्णांचं उदाहरण दिलं, ज्याचं कॉर्निया ट्रान्सप्लान्ट झालं होतं. 'मी डोळ्यांच्या मॅक्रो फोटोसाठी iPhone 13 pro max चा वापर करत आहे. यासाठी हा फोन परिणामकारक ठरतो आहे. अशाप्रकारे कॅमेरा वापरण्याचाी परवानगी घेतली असल्याचंही' त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Apple, Iphone, Smartphone

  पुढील बातम्या