मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Aadhar Update: खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेट करण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

Aadhar Update: खोट्या वेबसाईटपासून सावधान, आधार अपडेट करण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

आधार अपडेटच्या नावाखाली काही खोट्या वेबसाईट्सद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. त्यामुळे आधार कार्डमध्ये बदल करताना, काही अपडेट करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे.

  नवी दिल्ली, 25 जानेवारी : सध्या सर्वच सरकारी कामांसाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी आधार कार्डची (Aadhar Card) गरज असते. आधार कार्ड देशात सर्वात महत्त्वाचं ओळखपत्र मानलं जातं. पण याचाच फायदा काही फसवणूक करणाऱ्यांकडून घेतला जात आहे. सध्या आधार कार्ड अपडेट (Aadhar Update) किंवा काही करेक्शन करायच्या नावाखील अनेकांच्या फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे आधार कार्डमध्ये बदल करताना, काही अपडेट करताना सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. खोट्या वेबसाईट्सपासून सावधान - आधार अपडेटच्या नावाखाली काही खोट्या वेबसाईट्सद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. या वेबसाईट्सवरही, कॉमन सर्विस सेंटरवर (CSC) केल्या जाणाऱ्या प्रोसेसप्रमाणेच काम होतं. युजर्सची फसवणूक करण्यासाठीच खोट्या वेबसाईट कॉमन सर्विस सेंटरप्रमाणे (Common Service Center) काम करतात. त्यामुळे आधार कार्डवर कोणतीही माहिती अपडेट करायाची असल्याची किंवा इतर आधारबाबत कोणत्याही माहितीसाठी, आधार कार्डच्या अधिकृत वेबसाईटवरच योग्य ती माहिती घ्या. UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरच कोणतीही माहिती अपडेट करा. त्यामुळे कोणतीही फसवणूक टाळता येईल.

  (वाचा - Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका; CAIT कडून कारवाईची मागणी)

  दरम्यान, सरकारने Cyber Dost या ट्विटर हँडलवर ट्विट करून लोकांना फ्रॉड बाबतच्या नव्या पद्धतींबाबत सतर्क केलं आहे. सध्या फ्रॉस्टर्स लोकांना एसएमएस पाठवून त्यांचं बँक अकाउंट खाली करत आहेत. लोकांनी मेसेजवर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही लिंकबाबतचा मेसेज आल्यास, त्वरित त्यांची तक्रार सायबर क्राईम पोलिसात करावी, असं मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे.

  (वाचा - सावधान! तुम्हालाही हा मेसेज आलाय का? गृह मंत्रालयाकडून फसवणुकीबाबत अलर्ट जारी)

  मागील काही महिन्यांपासून बँकिंग फ्रॉड (Banking Fraud) प्रकरणांत मोठी वाढ झाली आहे. वाढते फसवणुकीचे प्रकार पाहता वेळोवेळी बँका, आरबीआय आणि सरकारकडूनही याबाबत लोकांना सतर्क केलं जात आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Aadhar card

  पुढील बातम्या