• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • WhatsApp ऑडिओ मेसेजमधील नवीन अपडेट माहिती आहे का? काय होईल फायदा?

WhatsApp ऑडिओ मेसेजमधील नवीन अपडेट माहिती आहे का? काय होईल फायदा?

व्हॉट्सअॅपच्या युझर्सना लवकरच आलेल्या ऑडिओ मेसेज स्पीड कस्टमाईझ करता येणार आहे. ज्या व्यक्ती 9 ते 5 या काळात नोकरीत व्यग्र असतात, त्यांच्यासाठी या फीचरचा खूप उपयोग होऊ शकतो.

  • Share this:
मुंबई, 24 नोव्हेंबर : युझर्सना (Users) अॅप वापरताना चांगला अनुभव (Good Experience) येत राहावा, यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) सतत प्रयत्नशील आहे. एखाद्या मेसेजवर लवकर प्रतिक्रिया (Quickly Respond) देण्याचा ऑप्शन व्हॉट्सअॅपवर येणार आहे. त्यासाठी तुम्हाला नोटिफिकेशन (Notification) मिळेल, असं नुकतंच समोर आलं आहे. सध्या हे फीचर ( feature) डेव्हलपिंग स्टेजमध्ये आहे. व्हॉट्सअॅपच्या युझर्सना लवकरच आलेल्या ऑडिओ मेसेज स्पीड कस्टमाईझ करता येणार आहे. ज्या व्यक्ती 9 ते 5 या काळात नोकरीत व्यग्र असतात, त्यांच्यासाठी या फीचरचा खूप उपयोग होऊ शकतो. कारण वेळेअभावी त्यांना मेसेज पूर्णपणे ऐकायचा नसेल, तर ते तो मेसेज वेगाने ऐकू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही एखादा चित्रपट पाहत असताना मध्येच येणारी गाणी फास्ट फॉरवर्ड करू शकता करता, तसाच काहीसा हा प्रकार असेल. हा नवीन अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्रकारच्या युझर्ससाठी असेल. WABetaInfo ने असं वृत्त दिलं आहे, की 'व्हॉट्सअॅप व्हॉइस नोटसाठी प्लेबॅक स्पीड हे बटण आणत आहे. हे फीचर आयओएसवर व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जनमध्ये आलं आहे. परंतु ते अद्याप डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे. लवकरच हे फीचर व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड बीटासाठीदेखील सादर केले जाईल, अशी अपेक्षा आहे.'

WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी

व्हॉट्सअॅप 'या' फीचर्समध्ये करत आहे सुधारणा व्हॉट्सअॅप मीडिया शॉर्टकट ऑप्शन दुरुस्त करण्यासाठी अपडेट आणत आहे. काही युझर्सना मीडिया शॉर्टकट त्यांच्यासाठी उपलब्ध नसल्याचं लक्षात आलं होतं. आता व्हॉट्सअॅप एका नवीन अपडेटसह ही समस्या सोडवत आहे. जेव्हा तुम्ही इमेज, व्हिडीओ, जीआयएफ फाइल उघडता तेव्हा तुम्हाला तेथे आधीच एक क्विक एडिट शॉर्टकट मिळतो; पण व्हॉट्सअॅपने आठवडाभरापूर्वी मल्टिपल मीडिया उघडताना एक नवीन साइड शॉर्टकट जारी केला आहे. व्हॉट्सअॅप ट्रॅकर WABetaInfo ने म्हटलं आहे, की 'काही युझर्सना नवीन फास्ट एडिट शॉर्टकट दिसला आणि शॉर्टकट काम करत नसल्यामुळे ते कशासाठी आहे, असा प्रश्न त्यांनी केला.'

WhatsApp वरील या Fraud मुळे होऊ शकतं तुमचं अकाउंट रिकामं; अशी घ्या काळजी

एक निवेदन प्रसिद्ध करून WABetaInfo ने म्हटलंय, 'अँड्रॉइड 2.21.24.9 अपडेटसाठी नवीन व्हॉट्सअॅप बीटा व्हर्जन जारी केल्यानंतर, व्हॉट्सअॅप आता तो शॉर्टकट काढून टाकत आहे. भविष्यात ते पुन्हा एकदा शॉर्टकट सादर करण्याचा विचार करत आहेत की नाही याबद्दल माहिती नाही.' व्हॉट्सअॅप हे युझर्समध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे त्यामध्ये कोणती नवीन फीचर्स येतात, याकडे युझर्सचं लक्ष असतं व नवी फीचर्स कशा पद्धतीने उपयोगी आहेत, याचीही माहिती युझर्सकडून घेतली जात असते.
First published: