मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Vande Bharat Train: चक्क बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते ‘ही’ भारतीय ट्रेन, वाचा कुणालाच माहित नसलेल्या खास गोष्टी

Vande Bharat Train: चक्क बुलेट ट्रेनपेक्षाही वेगानं धावते ‘ही’ भारतीय ट्रेन, वाचा कुणालाच माहित नसलेल्या खास गोष्टी

Vande Bharat Train: मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात! वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक जाहीर

Vande Bharat Train: मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात! वंदे भारत ट्रेनचं वेळापत्रक जाहीर

Vande Bharat Train: सामान्य इंजिन असूनही वंदे भारतचे इंजिन अतिशय खास तंत्रज्ञानाद्वारे दुप्पट शक्ती निर्माण करते. या विशेष तंत्रज्ञानामुळे आता रेल्वे त्यात आणखी मोठे बदल करणार आहे. या स्पेशल ट्रेनबद्दल जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 26 सप्टेंबर: सध्या देशभरात वंदे भारत किंवा ट्रेन 18 ची चर्चा जोरात सुरू आहे. कारण या ट्रेनच्या दुसऱ्या पिढीनं टेस्ट रनमध्ये बुलेट ट्रेनलाही मात दिली आहे. वंदे भारतनं अवघ्या 52 सेकंदात 0-100 किमी/तास वेग घेतला. या ट्रेनचा कमाल वेग 180 ते 183 किमी/तास आहे. आता मुद्दा असा आहे की, या ट्रेनच्या इंजिनमध्ये असं काय विशेष आहे की या ट्रेननं इतका वेग पकडला? त्याचबरोबर या ट्रेनच्या तिसर्‍या पिढीमध्ये कोणते मोठे बदल होणार आहेत, हेच आपण जाणून घेणार आहोत.

ट्रेनच्या इंजिनबद्दल बोलायचं झाल्यास या ट्रेनमध्ये एक सामान्य लोकोमोटिव्ह इंजिन आहे. परंतु त्याचा आकार तुम्हाला इतर लोकोमोटिव्ह इंजिनच्या तुलनेत वेगळा असल्याचं दिसतं. या इंजिनला सेल्फ प्रोपेल्ड इंजिन असं नाव देण्यात आलं आहे. हे तांत्रिकदृष्ट्या नियमित इंजिन आहेत परंतु त्यात काही कॉस्मेटिक बदल करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया वंदे भारतच्या इंजिनची माहिती...

वंदे भारतचे इंजिन का खास आहे?

  • वंदे भारतमध्ये सेल्फ प्रोपेल्ड इंजिन आहे. हे इंजिन डब्यांशीच जोडलेलं आहे, म्हणून त्याला हे नाव देण्यात आलं आहे.
  • लोकोमोटिव्हबद्दल बोलायचं झालं तर हे इंजिन 6000 हॉर्सपॉवर जनरेट करतं.
  • त्याच वेळी, 8 डबे देखील इलेक्ट्रिक मोटरनं सुसज्ज आहेत. जे त्याची शक्ती वाढवते आणि 12 हजार हॉर्सपॉवर पर्यंत नेतं.
  • या कारणास्तव याला सेमी-हायब्रिड इंजिन म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
  • यामुळेच वंदे भारतचा पिकअप आणि टॉप स्पीड अचानक गगनाला भिडतो.

वंदे भारत ट्रेनच्या वेगामागचं कारण-

इंजिनच्या विशेष क्षमतेसोबतच वंदे भारतची खासियत म्हणजे तिचा आकार. ही संपूर्ण ट्रेन एरोडायनॅमिक शेपमध्ये आहे. तिच्या पुढच्या भागाबद्दल बोलायचं झालं तर ते शंकूच्या आकाराचं आहे जे हवेचा रोध कमी करतं. तसेच ट्रेनमध्ये कुठेही कडा नाहीत. नीट पाहिल्यास या ट्रेनच्या प्रत्येक कोपऱ्याला गोलाकार किंवा उतार देण्यात आला आहे. त्यामुळे वारा बाजूला ढकलला जातो.

हेही वाचा:  काय सांगता! चक्क मोबाइलपेक्षाही लवकर चार्ज होते 'ही' कार, वाचा चकित करणाऱ्या गोष्टी

होणार हा मोठा बदल-

वंदे भारतच्या तिसऱ्या पिढीमध्ये रेल्वेकडून मोठा बदल केला जाणार आहे. रेल्वे आता वंदे भारतचे लोकोमोटिव्ह काढून त्याचे पूर्णपणे विद्युतीकरण करणार आहे. मात्र, यासाठी ट्रेनमध्ये तसेच ट्रॅकमध्ये मोठे बदल करावे लागतील कारण ते सामान्य इलेक्ट्रिक इंजिनपेक्षा तीन ते चार पट जास्त वीज वापरणार आहे. या बदलानंतर ट्रेन अधिक शांत आणि वेगवान होईल अशी अपेक्षा आहे. तसेच, तिचा देखभाल खर्चही कमी होईल आणि त्यामुळे अजिबात प्रदूषण होणार नाही.

ट्रेन 18 हे नाव का ठेवण्यात आलं?

वंदे भारतची निर्मिती ऑक्टोबर 2018 मध्ये पूर्ण झाली आणि ती रुळावर आली. या ट्रेनमध्ये 80 टक्के भाग स्वदेशी आणि 20 टक्के परदेशातून आयात केले जातात. या ट्रेनच्या निर्मितीमागील मुख्य हेतू शताब्दी ट्रेनला पर्याय देणं हा आहे. या ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी 15 टक्के जास्त वेळ लागतो. वंदे भारतला ट्रेन 18 असेही म्हणतात. यामागील कारण म्हणजे ही ट्रेन तयार करण्यासाठी 18 महिने लागले. त्यामुळे तिला हे नाव देण्यात आले. मात्र नंतर तिचं नाव वंदे भारत ठेवण्यात आलं आणि आता त्याच नावानं ओळखली जाते. या ट्रेनला 16 डबे असतील आणि तिची एकूण लांबी 384 मीटर असेल.

First published:

Tags: Indian railway, Train