Home /News /technology /

IRCTC द्वारे तिकीट बुक करता? या पद्धतीने बुकिंग केल्यास लवकर येईल रिफंड

IRCTC द्वारे तिकीट बुक करता? या पद्धतीने बुकिंग केल्यास लवकर येईल रिफंड

IRCTC-iPay App द्वारे तिकीट बुकिंग केल्यास, पैसे लवकर रिफंड येतात. जाणून घ्या काय आहे प्रोसेस -

  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : IRCTC वरुन तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांची अनेकदा एक समस्या असते, की तिकीट कॅन्सल केल्यानंतर अनेक दिवसांपर्यंत पैसे रिफंड येण्यासाठी वाट पाहावी लागते. परंतु IRCTC-iPay App द्वारे तिकीट बुकिंग केल्यास, पैसे लवकर रिफंड येतात. जाणून घ्या काय आहे प्रोसेस - ही कोणतीही नवी सर्विस नाही. IRCTC iPay App ची सुविधा आधीपासूनच रेल्वे प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. याद्वारे तिकीट बुकिंग केल्यास, कोणत्याही बँकेच्या पेमेंट गेटवेद्वारे त्याचं पेमेंट होतं. त्यामुळेच तिकीट कॅन्सल झाल्यानंतर, रिफंड येण्यासाठी अधिक वेळ लागत नाही. IRCTC iPay App द्वारे कसं कराल तिकीट बुकिंग? - सर्वात आधी irctc.co.in वर लॉगइन करा. - प्रवासासंबंधी माहिती भरा. - ट्रेनची निवड करा. - पेमेंटचा पहिला ऑप्शन IRCTC iPay वर क्लिक करा आणि त्यानंतर Pay and Book ऑप्शनवर क्लिक करा. - त्यानंतर क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा UPI संबंधी माहिती द्या. - सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिकीट बुक होईल आणि कन्फर्मेशनचा SMS तसंच ईमेलही येईल.

  Cyber Dost Alert!सेकंदात गायब होऊ शकते तुमची कमाई,हे App चुकूनही डाउनलोड करू नका

  IRCTC ई-वॉलेटद्वारे कसं कराल तिकीट बुक? सर्वात आधी IRCTC आईडी लॉगइन करावं लागेल. त्यानंतर जिथून ट्रेन बोर्ड होणार आहे ते आणि डेस्टिनेशन, तसंच तारीख सिलेक्ट करा. आता ज्या ट्रेनचं तिकीट हवं आहे त्याला सिलेक्ट करा आणि Book Now वर क्लिक करा. डिटेल्स रिव्ह्यू करा आणि कॅप्चा कोड टाका. आता पेमेंट पर्यायावर जा. इथे पेमेंट गेटवेमध्ये IRCTC ई-वॉलेटवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर ट्रान्झेक्शन पासवर्ड टाकावा लागेल. त्यानंतर कन्फर्मेशन पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल. इथे OTP टाकावा लागेल, जो तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर येईल. त्यानंतर ई-वॉलेटद्वारे पेमेंट होईल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Indian railway, IRCTC, Tech news

  पुढील बातम्या