मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचाही अँड्रॉइड फोन स्लो झालाय? 'हे' काम नक्की करून बघा; लगेच वाढेल स्पीड

तुमचाही अँड्रॉइड फोन स्लो झालाय? 'हे' काम नक्की करून बघा; लगेच वाढेल स्पीड

फोनचा वेग मंदावण्यासाठी अनेक कारणं असू शकतात.

फोनचा वेग मंदावण्यासाठी अनेक कारणं असू शकतात.

फोनचा वेग मंदावण्यासाठी अनेक कारणं असू शकतात.

    मुंबई, 23 ऑगस्ट स्मार्टफोन्समुळे सध्याच्या ऑनलाइन जगात वावरणं खूप सोपं झालंय. अनेक कामं चुटकीसरशी, जिथे आहोत तिथून सहज होतात. अर्थात, जसजसा स्मार्टफोन जुना व्हायला लागतो, तसतसा तो थोडा स्लो व्हायला लागल्याचं आपल्या लक्षात येतं. काही वेळा तो हँगही होतो. फोनचा वेग मंदावण्यासाठी अनेक कारणं असू शकतात. तरीही अनेकदा त्यामागचं महत्त्वाचं कारण असतं बरीच साठून राहिलेली कॅशे मेमरी (Cache Memory). कॅशे म्हणजे डेटा तात्पुरत्या स्वरूपात साठवण्याची एक जागा असते. वेबसाइट्स, ब्राउझर्स, अॅप्स (Apps) वेगाने लोड व्हावीत, यासाठी कॅशमध्ये डेटा तात्पुरत्या स्वरूपात साठवला जात असतो. काही साइट्ससाठी लागणारा युझरनेम-पासवर्डसारखा ऑटो-फिल डेटा (Auto Fill Data) वगैरे या कॅशेमध्ये साठवून ठेवला जातो. त्यामुळे युझर्सना (Users) हा डेटा प्रत्येक वेळी भरत राहावं लागत नाही. त्यामुळे वेळ वाचतो खरा; पण बरेच दिवस हा डेटा साठत राहिला, तर तो फोनच्या परफॉर्मन्सवर (Smartphone Performance) परिणाम करतो. त्यामुळे ठरावीक दिवसांनी हा डेटा काढून टाकणं फायद्याचं असतं.

    बहुतांश अँड्रॉइड फोन्समध्ये (Android Phone) क्रोम ब्राउझर (Chrome Browser) असतो. त्यातून ब्राउझर कॅशे क्लिअर (Cache Clear) कसा करायचा, याची माहिती आपण इथे घेऊ या. काही फोन्समध्ये वेगळे ब्राउझर्स असू शकतात; पण ब्राउझर कोणताही असला तरी त्याच्या सेटिंग्जमध्ये (Settings) कॅशे क्लिअर करण्याचा पर्याय असतोच.

    तुमच्या अँड्रॉइड फोनवर क्रोम ब्राउझर ओपन करावा.

    ब्राउझरच्या उजवीकडच्या वरच्या कोपऱ्यात मेनू बटणवर क्लिक करावं. तीन उभ्या डॉट्सवर मेनू हा पर्याय उपलब्ध असतो.

    त्यात सेटिंग्ज या पर्यायावर क्लिक करावं.

    त्यात ‘Privacy and Security’ हा पर्याय निवडावा.

    त्यानंतर Clear browsing data यावर टॅप करावं.

    तिथे तुम्हाला कालावधी अर्थात Time Range विचारली जाईल. किती कालावधीतला डेटा क्लिअर करायचा आहे त्यानुसार ते निवडावं. तुम्हाला फक्त कॅशे क्लिअर करायचा असेल, तर Browsing history आणि Cookies and site data हे दोन पर्याय अन-सिलेक्ट करावेत.

    Clear data हा पर्याय निवडावा.

    ब्राउझर कॅशे क्लिअर करण्याचा विचार पहिल्यांदा डोक्यात येतो; मात्र अॅप कॅशे मेमरी क्लिअर केल्याचा खूप मोठा परिणाम फोनच्या परफॉर्मन्सवर होतो. कारण फोनचं स्टोरेज आणि स्पीड यांमध्ये वाढ होते. अॅप कॅशे क्लिर करण्यासाठी खालील टप्प्यांत कार्यवाही करावी.

    फोनची सेटिंग्ज ओपन करावीत.

    त्यात स्टोरेज या पर्यायावर टॅप करावं.

    Other apps यावर टॅप करावं.

    यानंतर अॅप्सची लिस्ट समोर येईल. सर्वाधिक स्टोरेज वापरणाऱ्या अॅप्सपासून कमी स्टोरेज वापरणाऱ्या अॅप्सपर्यंतची ती यादी असेल.

    ज्या अॅपचा कॅशे क्लिअर करायचा असेल, ते अॅप सिलेक्ट करावं.

    त्यानंतर Clear cache वर टॅप करावं.

    आणखी काही स्पेस मोकळी करायची असेल, तर Clear Storage वर टॅप करावं. त्यामुळे अॅपचा स्टोअर्ड डेटा डिलीट होईल; पण अॅप डिलीट होणार नाही. नको असलेली अॅप्स आणि नको असलेले फोटोज वेळोवेळी डिलीट करावेत, जेणेकरून फोनचा स्पीड चांगला राहील.

    First published:
    top videos

      Tags: Smartphone, Technology