Home /News /technology /

सावधान! Browser वर वेबसाइटचं नाव टाइप करताना घ्या काळजी; अन्यथा होऊ शकतं नुकसान

सावधान! Browser वर वेबसाइटचं नाव टाइप करताना घ्या काळजी; अन्यथा होऊ शकतं नुकसान

क्षुल्लक चुकीमुळे तुमचं मोठं नुकसानदेखील होऊ शकतं. त्यामुळे काळजी घेणं खूप महत्वाचं आहे; पण यासाठी नेमकं काय करावं, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल.

  मुंबई, 04 मे:   गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान (Technology) वेगानं विकसित होत आहे. डिजिटलायझेशनमुळे जवळपास कोणतंही काम करणं सहजसुलभ झालं आहे. एकीकडे प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या होत असताना, दुसरीकडे हॅकिंग (Hacking), सायबर गुन्हेगारीचा (Cyber Crime) धोका वाढला आहे. हॅकर्सदेखील आता वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून फसवणूक करताना दिसत आहेत. बॅंकिंग पासवर्ड चोरण्यासाठी हॅकर्स आता नव्या तंत्राचा अवलंब करत आहेत. यूआरएल हायजॅकिंग (URL Hijacking) हा त्यापैकीच एक प्रकार होय. तुम्ही ब्राउझरवर एखाद्या वेबसाइटचं नाव टाइप करताना निष्काळजीपणा केला किंवा शब्द चुकलात, तर हॅकर्सच्या जाळ्यात अलगदपणे अडकू शकता. या क्षुल्लक चुकीमुळे तुमचं मोठं नुकसानदेखील होऊ शकतं. त्यामुळे काळजी घेणं खूप महत्वाचं आहे; पण यासाठी नेमकं काय करावं, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल. यूआरएल हायजॅकिंग टाळण्यासाठी काही गोष्टींची दक्षता घेणं आवश्यक आहे. याविषयीची माहिती देणारं वृत्त `टीव्ही नाइन हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. यूआरएल हायजॅकिंग हा फसवणुकीचा नवा मार्ग आहे. ब्राउझरवर वेबसाइटचं (Website) नाव चुकीचं टाकलं गेलं, तर नकळत तुम्ही हॅकर्सच्या जाळ्यात अडकू शकता. यामुळे तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. यूआरएल हायजॅकिंगला टायपोस्क्वॅटिंग (Typosquatting) असंही म्हटलं जातं. अशा प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काही गोष्टींचा अवलंब करणं आवश्यक आहे. तुम्ही Google Chrome वापरता? लगेच करा हे काम, सरकारचा मोठा इशारा
  यूआरएल हायजॅकिंग टाळण्यासाठी सर्वप्रथम ब्राउझरवर वेबसाइटचं नाव योग्य टाइप केलं आहे की नाही, हे तपासून पाहावं. काही युझर्स नेमकी हीच चूक करतात. वेबसाइट ओपन झाल्यावर त्यात काही वेगळेपण जाणवत नाही ना, हे पाहणंदेखील गरजेचं आहे. तुम्हाला वेबसाइटविषयी शंका येत असेल तर कोणत्याही लिंकवर क्लिक न करता पुन्हा मागे यावं किंवा टॅब थेट बंद करावं.
  यूआरएल हायजॅकिंग हा एक प्रकारचा सायबर अ‍ॅटॅक (Cyber Attack) अर्थात सायबर हल्ला आहे. यात हॅकर्स इंटरनेट युझर्सची बनावट वेबसाइटच्या (Fake Website) माध्यमातून फसवणूक करतात. युझरने ब्राउझरवर वेबसाइटचं नाव चुकीचं टाइप केलं तर त्या वेबसाइटच्या नावाशी साधर्म्य असलेल्या अन्य वेबसाइटवर तुम्ही जाता आणि अलगदपणे हॅकर्सच्या जाळ्यात अडकता. 'या' 5 चुका करू नका, नाहीतर WhatsApp अकाउंट होईल बंद!
  यूआरएल हायजॅकिंगसाठी सर्वप्रथम युझर्स सर्वाधिक प्रमाणात वापरत असलेल्या कॉमन वेबसाइट्सवरून बनावट वेबसाइट तयार केली जाते. उदाहरणार्थ, ई-कॉमर्स वेबसाइट, नोकरीविषयी माहिती देणाऱ्या वेबसाइट किंवा नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या वेबसाइट्स. हॅकर्स बनावट वेबसाइटचं नाव ठेवताना हेराफेरी करतात. उदाहरणार्थ, ई-कॉमर्सची सर्वांत लोकप्रिय वेबसाइट Amazon.in ही आहे. हॅकर्स आपल्या बनावट वेबसाइटचं नावदेखील या नावाशी सुसंगत असं ठेवतात. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. यासाठी हॅकर्स Amzon.in,Amazan.in किंवा Amezon.in असं नाव निवडतात. अशा वेगळ्या नावानं ते डोमेनची नोंदणीदेखील करून घेतात. जेव्हा एखादा युझर अ‍ॅमेझॉन हा शब्द चुकीचा टाइप करतो किंवा ब्राउझरवर तशाच शब्दांचा वापर करतो तेव्हा तो थेट हॅकर्सच्या बनावट वेबसाइटवर पोहोचतो. या वेबसाइटवरच्या विविध लिंकवर क्लिक केल्यावर किंवा ऑनलाइन मनी ट्रान्झॅक्शनच्या (Online Money Transaction) पर्यायाचा वापरल्यानंतर युझर्सची फसवणूक होते.
  First published:

  Tags: Online fraud, Technology

  पुढील बातम्या