Home /News /technology /

तुमचाही फोन मुलांच्या हातात असतो? Free App नादात महिलेला बसला मोठा फटका

तुमचाही फोन मुलांच्या हातात असतो? Free App नादात महिलेला बसला मोठा फटका

आपण कोणत्याही लिंकवर क्लिक न करता, लिंकवरुन फाइल्स डाउनलोड न करता सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. पण हा ऑनलाइन स्कॅम सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या Google Play Store वरच झाला तर...

  नवी दिल्ली, 4 मे : इंटरनेट, ऑनलाइन जगात सर्वच जण एकमेकांशी डिजीटली जोडले गेले आहेत. अनेकजण पेमेंट करतानाही यूपीआय, डिजीटल वॉलेट आणि नेट बँकिंग Apps चा वापर करतात. याद्वारे जवळपास सर्वांचेच फायनेंशियल डिटेल्स आपल्या स्मार्टफोन उपलब्ध आहेत. याच गोष्टीचा फायदा हॅकर्सकडून घेतला जात आहे. त्यामुळे ऑनलाइन स्कॅमपासून सावध राहणं गरजेचं आहे. आपण कोणत्याही लिंकवर क्लिक न करता, लिंकवरुन फाइल्स डाउनलोड न करता सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करतो. पण हा ऑनलाइन स्कॅम सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या Google Play Store वरच झाला तर...कारण अनेक जण कोणताही विचार न करता गुगल प्ले स्टोरवरुन फ्री Apps, गेम्स डाउनलोड करतात. हीच बाब एका महिलेसाठी चांगलीच धोकादायक ठरली. महिलेने एक App डाउनलोड केल्यानंतर हजारो रुपयांचं नुकसान करुन घेतलं आहे. ही घटना युकेमध्ये घडली असून दोन लहान मुलांनी आपल्या आईच्या फोनवरुन एक फ्री App डाउनलोड केलं, त्यात 10000 रुपयांचा फटका बसला. याबाबत महिलेले अनुभव शेअर करत माहिती दिली. तिन सांगितलं, माझा फोन माझ्या मुलाकडे होता. तो यूट्यूबवर काही पाहत होता आणि Epic Slime – Fancy ASMR Slime Game Sim नावाच्या गेमसाठी एक जाहिरात आली. त्यानंतर काहीही संशयास्पद न वाटल्याने तिने मुलाला ते डाउनलोड करण्यासाठी सांगितलं. त्यानंतर गुगल प्ले कडून हे App खरेदी केल्याबद्दल धन्यवाद देणारा ईमेल आला. तसंच सदस्य फी म्हणून 6600 रुपये घेण्यात आले.

  हे वाचा - Fraud Loan App Scam: चुकूनही डाउनलोड करू नका हे App, बसेल मोठा फटका

  यानंतर महिलेने पैसे परत मागितले. परंतु गुगलने त्या App ची पैसे परत करण्याची पॉलिसी नसल्याचं सांगितलं. परंतु महिलेने तरीही डेव्हलपरशी सतत संपर्क साधून, गुगलला अनेक रिपोर्ट पाठवून पैसे मिळवले. परंतु आधी मोठा आर्थिक फटका, त्रास सहन करावा लागला. त्यामुळे कोणतंही App थेट डाउनलोड करू नका. त्याआधी त्याची माहिती घेणं गरजेचं आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Cyber crime, Online fraud, Tech news

  पुढील बातम्या