Home /News /technology /

Facebook वापरताना चुकूनही करू नका अशी पोस्ट, एका चुकीमुळे थेट होईल तुरुंगवास

Facebook वापरताना चुकूनही करू नका अशी पोस्ट, एका चुकीमुळे थेट होईल तुरुंगवास

सोशल मीडियाचा, Facebook चा वापर करताना सावधपणे करणं गरजेचं आहे. चुकीची पोस्ट केल्याचं आढळल्यास थेट जेलची हवा खावी लागू शकते.

  नवी दिल्ली, 8 जानेवारी : सोशल मीडिया सर्वांच्याच आयुष्यात एक महत्त्वाचा भाग झाला आहे. अशात अनेक लोक सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Facebook चा मोठ्या प्रमाणात वापर करतात. फोटो, व्हिडीओ, आपली पर्सनल मतं, अशा अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मवर शेअर केल्या जातात. एकमेकांच्या फोटोवर कमेंटही या माध्यमातून केल्या जातात. परंतु अनेकदा काही लोक फेसबुकवर असं काही लिहितात, की त्यामुळे मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. यामुळे कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते. सोशल मीडियाचा, Facebook चा वापर करताना सावधपणे करणं गरजेचं आहे. चुकीची पोस्ट केल्याचं आढळल्यास थेट जेलची हवा खावी लागू शकते.

  हे वाचा - Alert! WhatsApp वरुन चोरी होऊ शकतात तुमचे बँक डिटेल्स, असा होतोय Fraud

  - तुम्ही केलेल्या पोस्टद्वारे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अपशब्दांचा वापर होत असेल, तर कायदेशीर कारवाईसह तुरुंगवास होऊ शकतो. - तुमच्या पोस्टबाबतची माहिती IT सेलपर्यंत पोहोचल्यास कायदेशीर कारवाईला सामारं जावं लागू शकतं. - फेसबुकवर कोणतीही पोस्ट शेअर करण्याआधी किंवा पोस्ट करण्याआधी ती पोस्ट आपत्तीजनक नाही ना हे तपासा. पोस्टमध्ये एखाद्या व्यक्तीबाबत, संस्थेबाबत, संप्रदायाबाबत चुकीचं किंवा भावना दुखावणारं लिहिलं नाही ना हे तपासा. तुमच्या पोस्टमध्ये असं काही आढळल्यास थेट जेल होऊ शकते. - व्हायरल किंवा इतर कोणतीही पोस्ट त्याची शहानिशा न करता शेअर केल्यासही तुम्ही अडचणीत येऊ शकता. फॅक्टलेस माहिती शेअर केल्यासही मोठ्या समस्येचा सामना करावा लागू शकतो.

  हे वाचा - Online Payment करताना समस्या आली? BHIM, UPI युजर्स अशी करा ऑनलाइन तक्रार

  - त्यामुळे कोणतीही अधिक माहिती नसलेली पोस्ट करताना सर्वात आधी त्याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची एक चूक गंभीर गुन्ह्याअंतर्गत थेट जेलमध्ये पोहोचवू शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या