Home /News /technology /

Fecebook वर या मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका, रिकामं होऊ शकतं बँक अकाउंट

Fecebook वर या मेसेजवर चुकूनही क्लिक करू नका, रिकामं होऊ शकतं बँक अकाउंट

जर तुम्हीही फेसबुक युजर असाल, तर सावध व्हा कारण एक लहानशी चूकही मोठं नुकसान करू शकते.

  नवी दिल्ली, 9 मे : सध्याच्या काळात अतिशय कमी लोक असतील जे स्मार्टफोनवर सोशल मीडियाचा वापर करत नसतील. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी फेसबुक असा प्लॅटफॉर्म आहे, जो सर्वाधिक वापरला जातो. जर तुम्हीही फेसबुक युजर असाल, तर सावध व्हा कारण एक लहानशी चूकही मोठं नुकसान करू शकते. सध्या एक स्कॅम अतिशय अॅक्टिव्ह आहे, ज्यात फेसबुकचं मेसेजिंग अॅप, फेसबुक मेसेंजरवर एक धोकादायक मेसेज पाठवला जात आहे. मागील काही दिवसांत फेसबुक मेसेंजरवर त्यांच्याच काही फेसबुक फ्रेंड्सकडून एक मेसेज येतो. या मेसेजमध्ये एक लिंक आणि सोबत एक टेक्स्ट येतो. यात तुम्ही या व्हिडीओमध्ये आहात का? (is it you in the video) असा प्रश्न विचारला जातो. परंतु हा मेसेज फ्रॉड, धोकादायक मेसेज आहे.

  हे वाचा - केवळ चार स्टेप्समध्ये डिलीट होईल Facebook Search History, पाहा सोपी पद्धत

  हा मेसेज मिळाल्यानंतर युजर्स लिंकवर क्लिक करुन स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करतात. या लिंकवर क्लिक करुन तुमचा फेसबुक आयडी आणि पासवर्ड टाकावा लागतो. पण या लिंकमध्ये तुमचा कोणताही व्हिडीओ मिळत नाही. पण हॅकर्सला तुमचे फेसबुक डिटेल्स मिळतात. त्याद्वारे तुमच्या कॉन्टॅक्टची माहिती आणि बँक डिटेल्स मिळवतात.

  हे वाचा - भारत सरकारकडून रोजगार मिशनअंतर्गत नोकरी देण्याचा दावा, वाचा काय आहे यामागचं सत्य

  तुमचं अकाउंट हॅक करुन तुमच्या अकाउंटमधून इतर फेसबुक फ्रेंड्सला मेसेज पाठवले जातात. त्यामुळे कोणत्याही यूआरएलवर क्लिक करण्याआधी लिंक https किंवा http पासून सुरू होतात ते तपासा. जर वेगळं काही असेल तर ही लिंक फेक ठरू शकते आणि तुमचं नुकसान करू शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या