मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

रुग्णालयात ICU मध्ये मोबाईल घेऊन जाणं ठरेल धोक्याचं, होऊ शकतं नुकसान

रुग्णालयात ICU मध्ये मोबाईल घेऊन जाणं ठरेल धोक्याचं, होऊ शकतं नुकसान

स्मार्टफोनद्वारे आयसीयूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया जाऊ शकतात. डॉक्टरही या वॉर्डमध्ये मोबाईल फोन घेऊन न जाण्याचं सांगतात.

स्मार्टफोनद्वारे आयसीयूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया जाऊ शकतात. डॉक्टरही या वॉर्डमध्ये मोबाईल फोन घेऊन न जाण्याचं सांगतात.

स्मार्टफोनद्वारे आयसीयूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया जाऊ शकतात. डॉक्टरही या वॉर्डमध्ये मोबाईल फोन घेऊन न जाण्याचं सांगतात.

  नवी दिल्ली, 15 ऑगस्ट : रुग्णालयात ICU अर्थात इंटेंसिव्ह केअर यूनिट सर्वात सेंसेटिव्ह अतिदक्षता वॉर्ड असतो, जिथे सीरियस रुग्णांवर उपचार केला जातो. या वार्डमध्ये रुग्णांच्या ट्रिटमेंटसाठी अनेक मशिन्स लावलेल्या असतात. तसंच रुग्णाला अनेक बॅक्टेरियापासूनही वाचवलं जातं, ज्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होऊ शकेल. परंतु स्मार्टफोनद्वारे आयसीयूमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया जाऊ शकतात. डॉक्टरही या वॉर्डमध्ये मोबाईल फोन घेऊन न जाण्याचं सांगतात. एका रिसर्चनुसार, रुग्णालयातील ICU मध्ये मोबाईल घेऊन जाणं, त्याचा वापर करणं रुग्णांसाठी जीवघेणं ठरू शकतं. डॉक्टर्स तसंच इतरांनाही या ICU मध्ये मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे. या रिसर्चमध्ये 100 पैकी 56 डॉक्टरांच्या मोबाईल की-पॅडवर बॅक्टेरिया आणि व्हायरस आढळले. यात अनेक प्रकारचे हानीकारक बॅक्टेरियाही होते. महत्त्वाची बाब म्हणजे अधिकतर बॅक्टेरियाची अँटी बायोटिक औषधांशी लढण्याची क्षमता वाढली होती. म्हणजे त्या बॅक्टेरियावर अनेक अँटीबायोटिक औषधांचाही परिणाम होऊ शकत नव्हता.

  Smartphone वापरताना तुम्ही या चुका करत असाल तर सावधान! फोन खराब होण्याचा धोका

  रिचर्समध्ये दिलेल्या माहितीनुसार, मोबाईलच्या वापरादरम्यान हाताची घाण, घाम की-पॅडवर जमा होतो. तसंच बोलताना तोंडातून उडणारे तुषारही मोबाईलवर जमा होतात. ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस मोबाईलच्या की-पॅड आणि इतर गॅपमध्ये जमा होतात.

  हातातच झाला Samsung Galaxy फोनचा ब्लास्ट, एका ठिणगीने संपूर्ण घर जळून खाक

  जर मोबाईल की-पॅड साफ केला नाही, तर बॅक्टेरिया व्हायरसच्या तुलनेत अधिक हानीकारक होतात आणि हळू-हळू टॉयलेट सीटहूनही अधिक धोकादायक होतात. त्यामुळेच ICU मध्ये रुग्ण असल्यास, मोबाईल आत घेऊ जाणं धोक्याचं ठरू शकतं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Smartphone

  पुढील बातम्या