Home /News /technology /

मोबाईलमधून तातडीने Uninstall करा हे Apps, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

मोबाईलमधून तातडीने Uninstall करा हे Apps, अन्यथा होऊ शकतं मोठं नुकसान

Avastने तयार केलेल्या एका रिपोर्टनुसार काही अॅपमधून युझर्सला टारगेट करून त्यांची माहिती चोरली जाते किंवा फसवणुकीचे प्रकार देखील घडत आहे.

    नवी दिल्ली, 12 नोव्हेंबर: बऱ्याचदा सॉफ्टवेअर अपडेट केलं की त्यासोबत अनेक अॅप अपोआप नव्यान install होतात. काहीवेळा त्यातून व्हायरस देखील येण्याची शक्यता असते. तर नको असलेल्या किंवा कमी वापरले जाणारे भरमसाठ अॅप फोनमध्ये नुसते भरून ठेवले तर फोन हँग होऊ शकतो. त्यामुळे फोनला नुकसान होऊ शकते. त्यामुळे असे अॅप तातडीनं आपल्या फोनमधून हटवणं गरजेचं आहे. हे अॅप आपल्या फोनची बॅटरी देखील खातात आणि फोनधली जागाही. असं केल्यामुळे बऱ्याचदा फोनचं आयुष्य वाढवण्यासाठी मदत होते. सर्वात पहिल्यांदा आपल्या फोनमध्ये नको असलेले, गेमिंग अॅप्स किंवा कमी वापरात असलेला अॅप्स काढून टाका. google play, google setting, android system असे अॅप्स फोनमधून काढू नका. त्यामुळे फोनच्या सिस्टीमला प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते. त्यानंतर फोन रिबूट करायचं आहे. याशिवाय कोणतंही अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याच्या टर्म आणि कंडिशन्स वाचून पुढे चला. डोळेझाकपणे सगळी माहिती कोणत्याही अॅपला देणं धोक्याचं ठरू शकतं. हे वाचा-चिंता वाढली! Pfizer Vaccine दिल्यानंतर लोकांमध्ये दिसली विचित्र लक्षणं Avastने तयार केलेल्या एका रिपोर्टनुसार काही अॅपमधून युझर्सला टारगेट करून त्यांची माहिती चोरली जाते किंवा फसवणुकीचे प्रकार देखील घडत आहे. त्यामुळे Fleeceware, Skins, Mods, Maps for Minecraft PE, Skins for Roblox, Live Wallpapers HD & 3D Background, MasterCraft for Minecraft, Master for Minecraft, Boys and Girls Skins, Maps Skins and Mods for Minecraft या पैकी कोणतंही अॅप तुम्ही डाऊनलोड केलं किंवा करायला सांगितलं तर वेळीच सावध व्हा. हे अॅप साधारण याआधी 10 लाखहून अधिकवेळा जगभरात डाऊनलोड झाले आहेत. हे अ‍ॅप अशा प्रकारे डिझाइन केले गेले आहे की वापरकर्त्यांना त्याचा सबस्क्रिप्शन शुल्क माहीत नसेल आणि या अ‍ॅपची चाचणी घेतल्यानंतर ते ते विसरतील. अशा प्रकारे, हे अ‍ॅप्स युझर्सच्या खात्यातून परस्पर पैसे काढतं त्यामुळे तुमचं खातं रिकामं होऊ शकतं वेळीच सावध व्हा. दिवाळीच्या सणाला फसवणुकीचे प्रकार देखील खूप वाढत आहेत.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Techonology

    पुढील बातम्या