सावधान! या कंपनीचे लॅपटॉप आता विमानातून घेऊ जाता येणार नाहीत

सावधान! या कंपनीचे लॅपटॉप आता विमानातून घेऊ जाता येणार नाहीत

या लॅपटॉपची बॅटरी जास्त तापते आणि त्याच्या सदोष निर्मितीमुळे स्फोट होण्याचाही धोका असतो, म्हणून ते चेकइन किंवा हँडबॅगेज कुठेही ठेवायला परवानगी नाकारण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 26 ऑगस्ट : मोबाईल आणि लॅपटॉप तयार करणारी जगातली सर्वांत नावाजलेली कंपनी Apple ला मोठा झटका बसेल अशी बातमी आहे. मॅकबुकचं ठरावीक Directorate General of Civil Aviation नागरी विमान वाहतून संचालनालयाने दिला आहे. Apple MacBook Pro चा 15 इंच लॅपटॉपची काही मॉडेल्स खराब आहेत म्हणून अॅपलने ते लॅपटॉप मागे घेतले होते. या लॅपटॉपची बॅटरी जास्त तापते आणि त्याच्या सदोष निर्मितीमुळे स्फोट होण्याचाही धोका असतो, म्हणून ते चेकइन किंवा हँडबॅगेज कुठेही ठेवायला परवानगी नाकारण्यात आली आहे.

DGCA ने दिलेल्या निवेदनात सर्व एअरलाइन्सला कळवण्यात आलं आहे की, अॅपल मॅकबुक प्रो 15 इंचची काही मॉडेल्स सदोष आहेत. हे फॉल्टी लॅपटॉप मॉडेल्स विमानातून नेणं धोक्याचं आहे. त्यामुळे प्रवाशांना या लॅपटॉपसह प्रवास करण्याची परवानगी देऊ नये. अॅपल मॅकबुक प्रोच्या काही जुन्या मॉडेल्समध्ये बॅटरी लवकर तापते असं आढळलं होतं. अशी गरम होणारी बॅटरी विमानप्रवासात धोकादायक ठरू शकते म्हणून सिंगापूर एअरलाईन्सने प्रथम या मॅकबुकसह प्रवासाला परवानगी नाकारली आता भारतातही कुठल्याही एअरलाईन्सने हे फॉल्टी लॅपटॉप घेऊन जाता येणार नाहीत.

हे वाचा - तुम्हीही स्मार्टफोन वापरता का? 'या' कंपन्या कॅन्सरला कारणीभूत असल्याचा आरोप!

मॅकबुकच्या काही जुन्या मॉडेल्सची बॅटरी ओव्हरहिट होते. त्यामुळे ती फुटण्याचाही धोका असतो. विमानातून अशी बॅटरी घेऊन जाणं सुरक्षेला मोठा धोका असल्यानं त्यावर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचा - रस्ता खचल्यावर केलाय हा जुगाड; पाईपवरून जाणाऱ्या कारचा VIDEO VIRAL

अॅपलनेदेखील काही मॉडेल्समध्ये दोष राहिल्याचे मान्य करून असे लॅपटॉप परत घेतले. पण अजूनही अनेक ग्राहक हे लॅपटॉप वापरत असण्याची शक्यता आहे.

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: August 26, 2019, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading