Netflix सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्राची नजर, ऑनलाइन मीडियावरही असणार अंकुश

Netflix सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता केंद्राची नजर, ऑनलाइन मीडियावरही असणार अंकुश

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अंकुश ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नेटफ्लिक्स, हॉटस्टार सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सरकारची नजर असणार आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर: सरकारने ऑनलाइन चित्रपट आणि ऑडिओ व्हिज्यूअल कार्यक्रम तसंच ऑनलाइन बातम्या आणि करंट अफेअर्स संदर्भातील कंटेट माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत आणण्याचे आदेश जारी केले आहेत. बुधवारी यासंदर्भात केंद्र सरकारकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरील (Over-the-top Platform) सिनेमा आणि वेब सीरिज सारखा डिजिटल ऑडिओ व्हिज्यूअल कंटेंट, त्याचप्रमाणे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरील बातम्यांचा कंटेट देखील मंत्रालयाच्या अखत्यारित येणार आहे. सध्या डिजिटल कंटेटच्या

ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अंकुश ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आता ऑनलाइन न्यूज पोर्टल त्याचप्रमाणे हॉटस्टार, नेटफ्लिक्स, अॅमॅझॉन प्राइम आणि त्याचप्रमाणे इतर ओटीटी प्लॅटफॉर्वर या मंत्रालयाचा अंकुश असणार आहे.

सध्या डिजिटल कटेंटवर नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा किंवा स्वायत्त संस्था नाही. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया प्रिंट मीडियावर, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन (एनबीए) न्यूज चॅनेलवर, अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया जाहिरातींवर तर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) चित्रपटाच्या कंटेटवर अंकुश ठेवते. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्वायत्त मंडळाने ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियमन करावे यासंदर्भातील याचिकेवर केंद्राचा प्रतिसाद मागविला होता. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र, माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसेच इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया यांना यासंदर्भात नोटीस बजावली आहे.

(हे वाचा-... तर दिवाळीआधी दिवाळं! SBI चा 42 कोटी ग्राहकांना अलर्ट, अजिबात करू नका हे काम)

ओटीटी  प्लॅटफॉर्मवर विविध फिल्ममेकर्सना किंवा वेबसीरिज निर्मात्यांना कोणत्याही अडथळ्याशिवाय त्यांचा कंटेट प्रदर्शित करण्याची मुभा दिली जात होती.

Published by: Janhavi Bhatkar
First published: November 11, 2020, 12:20 PM IST
Tags: internet

ताज्या बातम्या