Home /News /technology /

भारतात बंदी असूनही सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत PUBG पहिल्या नंबरवर

भारतात बंदी असूनही सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत PUBG पहिल्या नंबरवर

2020 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत पबजी पहिल्या नंबरवर आहे. सेन्सर टॉवरच्या (Sensor Tower) रिपोर्टनुसार ॲपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल स्टोअरवर सर्वाधिक कमाई करणारा गेम ठरला आहे.

  नवी दिल्ली, 17 डिसेंबर : पबजी मोबाईल गेम (PUBG) भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. भारत सरकारने सप्टेंबर महिन्यात पबजी गेमवर बंदी घातल्यामुळे कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं. परंतु इतर देशांमध्ये ही गेम अजूनही खेळला जातो. त्यामुळे पबजी गेम जगभरात सर्वाधिक कमाई करणारा गेम ठरला आहे. 2020 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत पबजी पहिल्या नंबरवर आहे. सेन्सर टॉवरच्या (Sensor Tower) रिपोर्टनुसार ॲपल अ‍ॅप स्टोअर आणि गुगल स्टोअरवर सर्वाधिक कमाई करणारा गेम ठरला आहे. भारतात बंदी असून देखील कंपनीने यावर्षी 1 बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे 7,351 कोटी रुपयांची कमाई केली. भारतातील सुरक्षा, अखंडता आणि संरक्षणांचं कारण सांगत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या 69A कलमाअंतर्गत भारताने सप्टेंबर महिन्यात चीनच्या अनेक ॲप्सवर बंदी घातली होती. पबजी गेमवरही बंदी आणली. त्यामुळे पुन्हा एकदा भारतात पबजी गेम लाँच करण्याचा विचार असून यासाठी कंपनीने भारतात आपली वेगळी उपकंपनी सुरु केली आहे. त्याचबरोबर मुख्य कंपनीने चीनमधील Tencent Games या कंपनीशी करार मोडला असून भारतीय युजर्सला लक्षात घेऊन पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) नावाचा नवीन गेम आणणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या (MeitY) परवानगीची वाट पाहिली जात आहे. कंपनी लवकरात लवकर भारतात आपला गेम सुरु करण्यासाठी प्रयत्नशील असून यासाठी परवानगी मिळवण्याची त्यांची धडपड सुरु आहे.

  (वाचा - PUBG Mobile येणार का? लाँचबाबत सरकारचा मोठा खुलासा)

  ऑनलाइन ॲनॅलिटिक्स फर्म सेन्सर टॉवरच्या डेटानुसार (Sensor Tower's Store Intelligence data) पबजी गेम आणि चीनमधील 'Game For Peace' या गेमने 2020 या आर्थिक वर्षात 2.6 बिलियन म्हणजेच अंदाजे 19,113 कोटी रुपयांची कमाई केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, 2019 च्या तुलनेत यात 64.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. पबजी नंतर सर्वात जास्त कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत, दुसऱ्या क्रमांकावर Honor of Kings हा गेम आहे. या गेमने यावर्षी 2.5 बिलियन म्हणजेच अंदाजे 18,378 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कोरोनाच्या या कठीण काळात अनेकजण घरी असल्याने यावर्षी मोबाईल गेमची कमाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वच मोबाईल गेमच्या कमाईमध्ये वाढ झाली असून, यावर्षी 75 बिलियन डॉलर्सची कमाई झाली असून 2019 च्या तुलनेत यात 19.5 टक्के वाढ झाली आहे.

  (वाचा - वाहनांवरील Number Plate बाबत महत्त्वाची बातमी; HSRP साठी असा करावा लागेल अर्ज)

  दरम्यान, 2019 मध्ये देखील पबजी मोबाईल आणि Honor of Kings या गेमने 1 बिलियन डॉलरची कमाई केली होती. पबजी आणि Honor of Kings नंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या गेमच्या यादीत Nantic कंपनीच्या Pokémon GO या गेमचा क्रमांक असून त्यांनी यावर्षी 1.2 बिलियन डॉलरची म्हणजेच अंदाजे 8,820 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

  (वाचा - Instagram ऑर्डर करताना सावधान! चॅटद्वारे तरूणीला 7 लाखांचा गंडा)

  त्याचबरोबर सर्वात जास्त कमाईच्या या यादीमध्ये Moon Active कंपनीच्या Coin Master आणि Roblox Corporation च्या Roblox या गेमचा क्रमांक लागतो.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: PUBG, Pubg game

  पुढील बातम्या