अ‍ॅपवरून वेश्याव्यवसाय! महिला आयोगाची पोलीस, दूरसंचार मंत्रालयाला नोटीस

गुगल प्ले स्टोअरवर असलेल्या अॅपवरून वेश्याव्यवसाय होत असल्याचा आरोप करत महिला आयोगानं पोलिसांना नोटीस पाठवली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 31, 2019 05:01 PM IST

अ‍ॅपवरून वेश्याव्यवसाय! महिला आयोगाची पोलीस, दूरसंचार मंत्रालयाला नोटीस

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : महिला आयोगानं दिल्ली पोलिसांना पुन्हा एकदा फैलावर घेतलं आहे. यावेळी त्यांनी एका मोबाईल अॅप्लिकेशनवरुन पोलिसांना नोटिस पाठवली आहे. दिल्ली महिला आयोगानं म्हटलं आहे की, लोकेंटो नावाचं अॅप वेश्याव्यवसायाला खतपाणी घालत आहे. हे अॅप बंद करण्यासाठी दिल्ली पोलिसांसह दूरसंचार मंत्रालयाला नोटिस पाठवण्यात आली आहे.

महिला आयोगानं म्हटलं आहे की, लोकेंटोसाऱखी अॅप्स बंद करण्याची गरज आहे. या अॅपमुळे समाजात वाईट परिणाम होत आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास महिला आयोगानं सांगितलं आहे.आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी मोबाईल अॅपवरून वेश्याव्यवसाय होत असल्याचा आरोप केला आहे.

गूगल प्ले स्टोअरवर आणि अॅपल स्टोअरवरसुद्धा हे अॅप असून यावरून एस्कॉर्ट सर्विस, स्ट्रिपर्स, कॉल गर्ल्स याबाबतच्या जाहिराती दिल्या जात आहेत.नोटिसीत महिला आयोगानं म्हटलं आहे की, दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करून लवकरच आरोपींना अटक करावी. फक्त लोकेंटोच नाही तर इतरही असे अॅप असतील तर त्यावर काय कारवाई केली आहे याची माहिती द्यावी. स्वाती मालीवाल यांनी या अॅपला ब्लॉक करण्याची आणि इतर अॅपवरही कारवाई करण्याची मागणी केली आहे.

कोल्हापुरात भररस्त्यावर दोन महिलांचा फ्री स्टाईल हाणामारी, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Google
First Published: Aug 31, 2019 09:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...