Home /News /technology /

'या' नंबरहून SMS आला तर सावधान! एका चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स

'या' नंबरहून SMS आला तर सावधान! एका चुकीमुळे रिकामा होईल बँक बॅलन्स

सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या एका चुकीमुळे तुमचा पूर्ण बँक बॅलन्स रिकामा होऊ शकतो.

    नवी दिल्ली, 22 मे : सायबर क्राईमच्या (Cyber Crime) घटनांमध्ये वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. गुन्हेगार मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. त्याचवेळी दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) सायबर क्राईम विभागाने काही नंबर शेअर करत सर्वांना सावधान राहण्याचा इशारा दिला आहे. या नंबरहून आलेल्या SMS मधून फसवणूक होण्याचा धोका आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार KYC मध्ये आलेल्या काही अडचणींमुळे तुमचा नंबर ब्लॉक होऊ शकतो अशी सूचना देणारा मेसेज या नंबरहून येतो. ही अडचण दूर करण्यासाठी काही नंबरवर फोन करण्याची सूचना या मेसेजमध्ये दिलेली आहे. जी मंडळी या मेसेजला फसतात, त्यांची फसवणूक होत आहे. DCP Cybercrime ने ट्विट करत या मेसेजचे स्क्रीन शॉट्स शेअर केले आहेत. "तुम्हाला देखील हा फसवणुकीता मेसेज आला असेल. त्यामध्ये तुमचे सिम काही KYC मधील समस्येमुळे ब्लॉक केले असून संबंधित नंबरवर फोन करा अशी सूचना दिली असेल. लक्षात ठेवा, या नंबरवर कधीही फोन करु नका. या मेसेजमध्ये सांगितलेले कोणतेही अ‍ॅप डाऊनलोड करु नका. त्याचबरोबर कोणतेही पेमेंट करु नका.' अशी सूचना दिल्ली पोलिसांनी केली आहे. Airtel ने जारी केला अलर्ट नुकताच Airtel कंपनीचे सीईओ गोपाळ वित्तल यांनी देखील त्यांच्या ग्राहकांना अलर्ट जारी केला आहे. कोरोना संकटाच्या काळात ग्राहकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज, असल्याचं आवाहन त्यानी केले आहे. सायबर क्रिमिनल ग्राहकांना VIP नंबरसाठी पेमेंट करणे किंवा अकाऊंटची माहिती देण्यासाठी थर्ड पार्टी  अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे प्रलोभन देत आहेत. त्याचबरोबर खोट्या OTP च्या माध्यमातूनही ग्राहकांची फसवणूक होत असल्याने सर्वांनी सावध राहावे असे आवाहन वित्तल यांनी केले आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Cyber crime, Delhi

    पुढील बातम्या