नवी दिल्ली, 26 मार्च : जर तुम्ही मोबाईल फोनवरुन ऑनलाईन डिजिटल ट्रान्झेक्शन्स करत असाल, तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. मोबाईलवरुन ऑनलाईन ट्रान्झेक्शन्स करणाऱ्यांनी अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. काही असे धोकादायक अॅप्स आहेत, जे गुगललाही चकमा देऊन युजर्सचं मोठं नुकसान करतात. असे अॅप्स तुमच्या मोबाईलमध्ये असतील, तर त्वरित डिलीट करा. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चेक पॉईंट रिसर्चमध्ये काही धोकादायक मॅलिशियस अॅप्सला आयडेंटिफाय करण्यात आलं आहे. जे युजर्सच्या फायनेंशियल ट्रान्झेक्शन्ससाठी धोकादायक ठरु शकतात. एका चुकीमुळे अकाउंट खाली होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
रिसर्च रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये Cake VPN, Pacific VPN, eVPN, BeatPlayer, BeatPlayer, QR/Barcode Scanner MAX, eVPN, Music Player आणि tooltipnatorlibrary असे अॅप्स असतील, तर ते धोकादायक ठरु शकतात. हॅकर्स या अॅप्सच्या मदतीने बँक डिटेल्सची चोरी करू शकतात.
हे अॅप्स मॅलिशियस अँड्रॉईड अॅप्स आहेत. रिपोर्टनुसार, हे अॅप्स, Clast82 नावाच्या ड्रॉपरने प्रभावित आहे, जो युजर्सच्या स्मार्टफोनमध्ये AlienBot Banker आणि MRAT ला इन्स्टॉल करतं. AlienBot एक मालवेअर आहे, जो फायनेंशियल अॅप्समध्ये फ्रॉड करतो. यामुळे बँकिंग डिटेल्सची चोरी होते. हे अॅप्स इतके स्मार्ट आहेत, की सहजपणे Google ला चकमा देतात. एवढंच नाही, तर हे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कोडमध्येही फ्रॉड करण्यास सक्षम असतात.
स्मार्टफोनवरुन फायनेंशियल ट्रान्झेक्शन्स करत असल्यास नेहमी ऑफिशियल अॅप्समधूनच करावं. फायनेंशियल अॅप्स कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या लिंकद्वारेच डाउनलोड करा. स्मार्टफोन आणि अॅप्स वेळोवेळी अपडेट करावेत. फायनेंशियल अॅप्स लॉक ठेवावेत तसंच फोनमध्ये कोणत्याही थर्ड पार्टी अॅपला डाउनलोड करू नका.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Online fraud, Personal banking, Tech news, Technology