मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Facebook, Instagram वर WhatsApp सारखी चॅट Security मिळायला का होतोय उशीर? वाचा कारण

Facebook, Instagram वर WhatsApp सारखी चॅट Security मिळायला का होतोय उशीर? वाचा कारण

आगामी काळात Facebook आणि Instagram अकाउंटमध्ये युजर्सला मेसेजिंग करताना End-To-End Encryption ची (chat security like WhatsApp on Facebook and Instagram) सुविधा मिळणार आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर : आगामी काळात Facebook आणि Instagram अकाउंटमध्ये युजर्सला मेसेजिंग करताना End-To-End Encryption ची (chat security like WhatsApp on Facebook and Instagram) सुविधा मिळणार आहे. सध्या ही सुविधा फक्त WhatsApp युजर्सलाच देण्यात येते. आता 2023 पर्यंत याचा फायदा फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सलाही घेता येणार असल्याची माहिती मेटावर्सचे सुरक्षा प्रमुख एंटीगोन डेविस यांनी दिली आहे. WhatsApp मेसेजिंग App चे सर्व हक्क हे मेटा कंपनीकडे आहेत. त्यामुळे आता फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्सला लवकरच End-To-End Encryption फीचर्सचा लाभ घेता येणार आहे.

'ही' सात ॲप्स तुमच्या फोनसाठी ठरु शकतात घातक, गुगलनंही केली कारवाई

याविषयी डेविस यांनी संडे टेलीग्राफमध्ये लिहिलंय की 'आम्ही हे फीचर युजर्सला देण्यासाठी फार वेळ घेत आहे. आम्ही लगेचच End-To-End Encryption फीचर्सची सेवा बंद करणार नाही. आम्ही युजर्सच्या सुरक्षेबद्दल कटिबद्ध आहोत'. कंपनीनं दिलेल्या स्पष्टीकरणामुळं आता युजर्सला दिलासा मिळणार आहे.

डिफॉल्ट End-To-End Encryption साठी उशीर का?

यासंदर्भात डेविस यांनी बोलताना सांगितलं, की आम्ही आता मेटा युजर्सच्या सुरक्षिततेसाठी विविध फीचर्स आणत आहोत. End-To-End Encryption च्या फीचर्समुळे ऑनलाईन गुन्हे रोखण्यास मदत होईल. या फीचरमध्ये युजरला कोणतेही अडथळे येऊ नयेत यासाठी फेसबुकसह इन्स्टाग्रामच्या युजर्सला हे फीचर तात्काळ देण्यास उशीर होत असल्याचं त्यांनी  म्हटलं आहे.

Google Play Store वर Joker Malware ची एन्ट्री, ताबडतोब डिलीट करा 'हे' 15 ॲप्स

याविषयी पुढे बोलताना त्यांनी म्हटलंय, की आम्ही याआधी काही जुन्या माहितीच्या आधारे संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण माहिती देण्यात सक्षम आहोत. सध्या फेसबुकमध्ये मेसेंजरवर Voice आणि व्हिडिओ कॉलसाठी End-To-End Encryption ची सर्विस देण्यात आलेली आहे. आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठीही End-To-End Encryption ची सुविधा दिली जाणार आहे.

First published:

Tags: Facebook, Instagram, Tech news, Whatsapp New Feature