शेअर इट, ट्रू कॉलरसह 42 चिनी अॅप देशासाठी धोकादायक

शेअर इट, ट्रू कॉलरसह 42 चिनी अॅप देशासाठी धोकादायक

या यादीत MI स्टोर, WeChat या अॅपचा समावेश आहे. MI स्टोर हे शाओमीच्या मोबाईलमध्ये प्रामुख्याने वापरलं जातं. तर WeChat हे मॅसजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असून हे चिनी कंपनीने तयार केले आहे.

  • Share this:

01 डिसेंबर : संरक्षण मंत्रालयाने आपल्या अधिकाऱ्यांना चीनने तयार केलेल्या सुमारे ४२ अॅपपासून चार हात लांब राहण्याचा सल्ला दिलाय. या अॅपच्या माध्यमातून चीन हेरगिरी करत असल्याचा भारतीय संरक्षण मंत्रालयाला संशय आहे.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, या यादीत MI स्टोर, WeChat या अॅपचा समावेश आहे. MI स्टोर हे शाओमीच्या मोबाईलमध्ये प्रामुख्याने वापरलं जातं. तर WeChat हे मॅसजिंग अॅप म्हणून लोकप्रिय असून हे चिनी कंपनीने तयार केले आहे.  या यादीत Shareit आणि Truecaller चाही समावेश आहे.

Truecaller ही स्वीडन अॅप आहे. पण संरक्षण मंत्रालयाच्या 'वापरू नका' या यादीमध्ये ट्रू कॉलरचाही समावेश आहे. ट्रू कॉलर ने लगेचच यावर स्पष्टीकरण देत आपण अशी हेरगिरी करत नसल्याचं स्पष्ट केलं. पण सध्यातरी संरक्षण मंत्रालय ट्रू कॉलरसाठी सुद्धा नाही म्हणतंय.

कोणत्या अॅपला नोटीस

संरक्षण मंत्रालयाने एकूण 42 अॅपला नोटीस बजावली आहे. यामध्ये WeChat, Weibo, ShareiT, Truecaller, UC News, UC Browser यांचा समावेश आहे. यासोबतच Mi Store, Mi Community, Mi Video call-Xiaomi हे सुद्धा आहे. भारतात सर्वात जास्त वी चॅट, शेअर इट, ट्रू कॉलर, यूसी न्यूज, यूसू ब्राऊजर, मी स्टोअर, मी कम्युनिटी, मी व्हिडिओ कॉल वापरले जातात. तसंच चीता क्लीन मास्टर सुद्धा माहिती चोरत असल्याचा संशय आहे.

ही सर्व अॅप देशवासीयांनी आपापल्या मोबाईल आणि डेस्कटॉप वरुन तातडीने हटवावी अश्या सूचना संरक्षण मंत्रालयाने दिल्या आहेत.  चीनी कंपन्यांनी भारतात आणलेले कमी पैशातले स्मार्टफोन हे अशी अनेप अॅप विनामूल्यही उपलब्ध करून देतात.

हे अॅप हटवा

ट्रू क़लर

शेअर इट

वी चॅट

विबो,

यूसी न्यूज

युसी ब्राऊजर

मी स्टोअर

मी कम्युनिटी

मी व्हिडिओ कॉल

चीता क्लीन मास्टर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2017 08:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading