मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /'डेथ मशीन'मुळे मृत्यूआधीच अनुभवता येणार मरण, त्रासदेखील होणार नाही

'डेथ मशीन'मुळे मृत्यूआधीच अनुभवता येणार मरण, त्रासदेखील होणार नाही

भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असं मत यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं.

भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असं मत यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं.

भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असं मत यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं.

    मुंबई, 6 जुलै : भारतात 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) इच्छा मृत्यूला (पॅसिव्ह इथुनेशिया) परवानगी दिली. आपला अखेरचा श्वास कधी घ्यावा, हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला आहे, असं मत यावेळी न्यायालयाने नोंदवलं होतं. इच्छा मृत्यू मागणाऱ्या व्यक्तीला जर गंभीर आजार असेल तर डॉक्टर त्याच्यावर उपचार करणे बंद करतात, लाईफ सपोर्ट मशीन काढून, खाण्याची ट्यूब हटवून त्या व्यक्तीला मरू देतात. जगात अगदी मोजक्या देशांमध्ये इच्छा मृत्यूला सशर्त परवानगी आहे. तर तुम्हाला हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे अमेरिकेतील डॉ. फिलीप निश्के यांनी एक असं मशीन बनवलंय. ज्याच्या माध्यमातून मरणारी व्यक्ती तिचं मरण अनुभवू शकते.

    डॉ. फिलीप यांनी काही वर्षांपूर्वी ॲमस्टरडॅमच्या फ्यूनरल फेअरमध्ये हे डेथ मशीन लोकांसमोर आणलं होतं. या मशीनमध्ये त्यांनी एक नवीन फीचर (feature) जोडलंय. याआधी हे यंत्र फक्त जे लोक मरू इच्छितात, त्यांच्यासाठीच होतं. पण आता नव्या फीचरमुळे कुणीही व्हर्च्युअलरित्या स्वतःचं मरण पाहू शकेल. व्हर्चुअल रिअॅलिटीच्या माध्यमातून एक कृत्रिम वातावरण निर्मिती केली जाते. शरीरातील महत्वाचे सेन्सेस प्रभावित करून खरंखुरं वातावरण तयार केलं जातं.

    डॉक्टर फिलीप यांनी 90 च्या दशकात त्यांच्या 4 रुग्णांना मरण्यासाठी इंजेक्शन दिलं होतं. हे चारही रुग्ण गंभीर आजारांनी ग्रस्त होते आणि ते कधीही बरे होऊ शकणार नव्हते. डॉ. फिलीप यांनी केलेल्या कृत्याला कायद्याने मान्यता होती. यानंतर डॉ. फिलीप यांना डेथ मशीन बनवण्याची प्रेरणा मिळाली. डॉ. फिलीप म्हणतात की माणसाला जीवन आणि मरण एकदाच मिळतं, त्यामुळे ते चांगलं असावं. त्यासाठी डॉ. फिलीप यांनी सारको नावाच्या मशीनवर काम करण्यास सुरुवात केली. सारको वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, या मशिनमध्ये एखादी व्यक्ती बसली की त्यातील ऑक्सिजन पातळी कमी व्हायला लागते. तसेच कार्बनडाय ऑक्साईडची पातळी स्थिर राहते. या मशिनचा वापर करून मरायचं झाल्यास त्रास कमी होतो, असं डॉ. फिलीप म्हणतात.

    ज्यांना चांगलं मरण अनुभवून जग सोडायचं आहे, त्यांच्यासाठी हे मशीन असल्याचं डॉ. फिलीप सांगतात. या मशीनमध्ये बसवण्यापूर्वी संबंधित व्यक्तिचे मानसिक संतुलन तपासले जाते. स्थिती ठिक असेल तर एक कोड दिला जातो. त्या कोडच्या मदतीने या मशीनला अॅक्सेस करता येतं. मशीनचे दार उघडून आत गेल्यानंतर एक बटन दाबावं लागतं. त्यानंतर मशीनमधील ऑक्सिजनची पातळी कमी कमी होऊ लागते. मात्र त्याला त्रास होत नाही. त्यानंतर बायोडिग्रेडेबल कॅप्सूल डिटॅच होते आणि जमिनीत गाडली जाते. तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना अखेरचं भेटून मरण पत्करू शकता. या मशिनमुळे मरताना त्रास होत नाही, असा डॉ. फिलीप यांचा दावा आहे.

    First published:
    top videos

      Tags: Death