मुंबई, 22 जानेवारी : तुम्ही डेटिंग अॅप्स (dating app)चा वापर करत आहात मग ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण डेटिंग अॅप्सबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे युजर्सनी सावध राहणं खुप गरजेचं आहे. खास करून टिंडर,(tinder) ग्रिंडर (Grindr) आणि क्युपिड (OKCupid) सारखे अॅप्स तुम्ही वापरत असाल तर तुमची वैयक्तीक माहिती धोक्यात आहे. नॉर्वे कंज्यूमर कौन्सिल (Norway consumer counsil) ने दावा केला आहे की या अॅप्सवरील माहिती हि अॅड टेक कंपन्यांना (Advertisement technology companies) दिली जात आहे.
नॉर्वे कंज्झुमर काउंसिल च्या रिपोर्ट नुसार डेटिंग अॅप्सवरील युजर्सची वैयक्तिक माहिती दुसऱ्या कंपन्यांना देणं हे युरोपियन डेटा प्रायव्हसी कायद्याचं उल्लंघन आहे. नॉर्वे कंझ्युमर कौन्सिल ना नफा या तत्वावर सरकारच्या मदतीसाठी चालवला जाणारा ग्रुप आहे. या ग्रुपने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन तंत्रज्ञानाद्वारे स्मार्टफोन यूजर्सचे प्रोफाइल ट्रॅक केलं जात आहे. या कौन्सिलने एका साइबर सिक्युरिटी कंपनी Mnemonic सोबत मिळून 10 अॅंड्राईड अॅप्सचा अभ्यास केला आहे. अॅंड्राईड अॅप्सच्या अभ्यासावरून ही धक्कादायक माहिती समोर आली की ही अॅप्स 135 वेगवेगळ्या थर्ड पार्टी अॅड कंपन्यांना यूजर्सचा डेटा शेअर करत आहे.
वाचा : मोबाईल चोरी झाला असेल तर 'इथं' शोधा, सरकारनेच उचललं पाऊल
माहिती लीक होण्याबाबत हा रिपोर्ट असं सांगतो की, आता परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे आणि यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक होऊ नये यासाठी कौन्सिलने युरोपियन रेग्युलेटर्सला कठोर कायदा लागू करण्यास सांगितलं आहे. डेटा प्रायव्हसी रेग्युलेशन (GDPR) कायदा लागू करण्यास सांगितलं आहे.
सावधान! तुमच्यावर हालचालींवर आहे नजर, फोटो एडिटिंगसाठी अॅप्स वापरणं धोकादायक
रिपोर्टनुसार Period tracker अॅप, Virtual makeup अॅप आणि Perfect 365 या अॅपवरील माहितीसुद्धा लीक होत आहे. या अॅपवरिल यूजर्सची वैयक्तीक माहितीसुद्धा जाहिरात कंपन्यांना दिली जात आहे. त्यामुळे जे युजर्स या अॅप्सचा वापर करत आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे.
वाचा : Android फोन्समध्ये Apple सारखी सुविधा; या कंपन्यांचे नवे फीचर
Published by:Manoj Khandekar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.